शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस, एकाच वेळी १५ जणांना चावा

By सदानंद नाईक | Updated: March 5, 2022 15:22 IST

महिन्याला ६०० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या घटना 

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून शुक्रवारी सुभाष टेकडी परिसरात एका कुत्र्याने १५ पेक्षा जास्त जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. अखेर शनिवारी कुत्र्यांच्या भांडणात चावा घेणाऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

उल्हासनगरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून नागरिक रात्रीचे १० वाजल्यानंतर बाहेर पडू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. शुक्रवारी सकाळ पासून रात्री पर्यंत एका कुत्र्याने १५ पेक्षा जास्त जणांचा चावा घेतला. याप्रकारने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्वांनी खाजगी रुग्णालयसह शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. शनिवारी सकाळी चावा घेतलेल्या कुत्र्यावर इतर कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील मध्यवर्ती रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी ३० तर महिन्याला ७०० पेक्षा जास्त कुत्रा चावल्याच्या घटनेची नोंद होत आहे, अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. तर महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक जाधव यांनी गेल्या तीन वर्षांपासून श्वानाचे नसबंदीकरण करण्यासाठी निविदा व फेरनिविदा काढीत असल्याची माहिती दिली. मात्र ठेकेदार मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुन्हा शॉर्टटर्मसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून कुत्र्याच्या नसबंदीकरण केंद्राचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. एका महिन्यात केंद्राचे नूतनीकरण होणार असल्याचा विश्वास उपायुक्त जाधव यांनी व्यक्त करून कुत्र्यांचे नसबंदीकरण सुरू होण्याचे संकेत दिले. 

रात्री १० नंतर अघोषित संचारबंदी? शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने, कुत्रा चावा घेल्याच्या घटनेत वाढ झाली. कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांसह नागरिक रात्रीचे १० नंतर घरा बाहेर पडण्यास भीत आहेत, एवढी दहशत भटक्या कुत्र्याची शहरात निर्माण झाली. महापालिकेने भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावी. अशा मागणीने शहरात जोर धरला आहे.

टॅग्स :dogकुत्राulhasnagarउल्हासनगर