शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

न्याय मिळवून देणाऱ्यां उपोषणकर्त्याच्या मतांशी मुलीसह तिचे आईवडील असहमत

By सुरेश लोखंडे | Updated: December 23, 2017 20:26 IST

जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले

ठळक मुद्देमुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट मुलगी १६ वर्षाची असल्याचे तिच्या वडीलांकडून सांगण्यात आले

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीकरिता उपोषणाला बसलेल्या विक्रांत कर्णिक यांच्या दाव्याशी आपण सहमत नसल्याचा दावा जयस्वाल यांच्याकडे कामावर असलेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी शनिवारी केला. मात्र तरीही आपण आपल्या आरोपांवर व चौकशीच्या मागणीवर ठाम असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी जयस्वाल यांनी यापूर्वीच केली आहे.ठाणे मतदाता जागरण अभियान व धर्मराज्य पक्षांसह अन्य सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभल्याने कर्णिक हे शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मुलीला कामावरून काढल्यानंतर तिला पुन्हा कामावर येण्यासाठी आयुक्तांच्या बंगल्यावरून तीन दिवस सतत फोन येत असल्याचे कर्णिक यांनी म्हटले असले तरी तिच्या आईने त्याचा साफ इन्कार केला. मात्र अल्पवयीन मुलगी कामाला ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे कर्णिक यांनी सांगितले. गुजरातहून मुलीला तिच्या आईवडिलासह उपोषणस्थळी उपस्थित करण्यामागे षडयंत्र असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच संबंधीत अल्पवयीन मुलीचे घरही तोडण्यात आल्याचा आरोपही कर्णिक यांनी केला.आपली मुलगी १६ वर्षाची असल्याचे तिच्या वडीलांकडून सांगण्यात आले. ती नेपाळमधील आचमा मारगू येथील शाळेत पाचवीपर्यंत शिकलेली आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. घर तोडल्यामुळे आम्ही दादरला वडिलांकडे गेलो आणि तेथून सुरतला गेलो. आमच्यावरील कथित अन्यायाविरुद्ध कुणीतरी उपोषण करीत केल्याचे कळल्यामुळे आम्ही येथे आलो. पण आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नसल्याचे संबंधीत मुलीचे वडील सुरेश परिवार यांनी स्पष्ट केले आहे. या परिवाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार