शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ बालगृहातील मुलांना नरकयातना

By admin | Updated: July 27, 2015 23:27 IST

शहरातील शासकीय कनिष्ठ बालगृह वसतिगृहातील मुलांच्या वाट्याला नरकयातना आल्या असून सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे.

उल्हासनगर : शहरातील शासकीय कनिष्ठ बालगृह वसतिगृहातील मुलांच्या वाट्याला नरकयातना आल्या असून सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. तसेच पिण्याचे अ‍ॅक्वागार्ड मशीन, टेलिफोन बंद असून संरक्षण भिंती पडल्याने मैदान जुगाराचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. उल्हासनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक शासकीय कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहांसह इतर वसतिगृहे असून त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात कनिष्ठ बालगृह असून बालगृहात ४० मुले निवासी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहाची व मैदानाची संरक्षण भिंत झोपडपट्टीधारकांनी तोडून मधोमध रस्ता केला आहे. परिसरातील जुगारी व गर्दुल्ल्यांनी मैदानाचा ताबा घेतला असून त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. बालगृहातील मुलांच्या गाद्या व चादरींना दुर्गंधी सुटली असून गाद्यांवर झोपल्याने मुले आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे अ‍ॅक्वागार्ड वर्षानुवर्षे बंद पडल्याने थेट नळावाटे आलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व अंघोळीसाठी करीत आहेत. बालगृहातील मुलांना पावसाळा व हिवाळ्यात गरम पाणी अंघोळीसाठी मिळावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून मैदानात सौरऊर्जा यंत्रणा उभी केली आहे. मात्र, यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागत आहे. बालगृहातून मुले पळून जाण्याच्या घटना घडत असून बांधकाम विभागाकडे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेचा अभावशासनाच्या अनियमित निधीअभावी टेलिफोन बंद पडला असून संपर्क साधण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे उघड झाले आहे. आई किंवा वडील नसणारे, निराधार, गरीब व भीक मागणाऱ्या मुलांना बालगृहात ठेवले जाते. बालगृहातील अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेच्या अभावामुळे मुलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. संरक्षण भिंत तोडल्याने मैदानाच्या मधोमध रस्ता झाला असून कोणीही आत-बाहेर जाऊ शकतो. तसेच दिवसा किक्रेट खेळणारी मुले तर रात्री गर्दुल्ले व जुगाऱ्यांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.