शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या पार्किंगवर येणार टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:27 IST

ठाकुर्लीतील म्हसोबा चौकात होणार कारवाई; जप्त केलेली वाहने ठेवायची कुठे?

डोंबिवली : ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात ठिकठिकाणी लावलेल्या नो-पार्किंगच्या फलकांबाबत अनभिज्ञ असलेली डोंबिवली वाहतूक शाखा आता मात्र कारवाईसाठी पुढे सरसावली आहे. या परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकींचे पार्किंग केले जात आहे. मात्र, आता वाहने उभी करायची कुठे, असा प्रश्न दुचाकीचालकांना पडला आहे.ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे या भागात वस्ती वाढली आहे. परंतु, येथे वाहनतळ नसल्याने नोकरदार सकाळी येथील म्हसोबा चौकात दुचाकी उभी करून रेल्वेस्थानक गाठतात. परंतु, केडीएमसीने आता तेथे नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. त्याची माहिती त्यांनी वाहतूक शाखेला दिलेली नव्हती. परिणामी, या दोन्ही विभागांतील समन्वयाचा अभाव दिसून आला होता. मात्र, वाहतूक शाखेने आता म्हसोबा चौकातील वाहनांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भातील अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.म्हसोबा चौकातील वाढत्या पार्किंगवर ‘पी-१’, ‘पी-२’, पे अ‍ॅण्ड पार्किंगचा प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी वाहतूक शाखेतर्फे केली जाणार होती. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची अंमलबजावणी झाली असती, तर केडीएमसीला त्यातून उत्पन्न मिळाले असते. परंतु, आता थेट कारवाईचा पवित्रा घेतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, म्हसोबा चौक हा नो-पार्किंग झोन ठरवल्याने पोलीस येथील दुचाकींवर कारवाई करणार आहेत. यावेळी उचललेली वाहने ठेवण्यासाठी जागा संबंधित विभागाकडे नाही. त्यामुळे वाहने ठेवायची तरी कुठे, असाही पेच पोलिसांसमोर आहे.अवजड वाहनांची वाहतूक रोखणार : येत्या एकदोन दिवसांत केडीएमसी मुख्यालयात वाहतूक नियोजनासंदर्भात बैठक होणार आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचे डम्पर, सिमेंट मिक्सर, पाण्याचे टँकर, कचरागाड्या, शाळेच्या मोठ्या बसची वाहतूक होते. ती पूर्णपणे रोखण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व-पश्चिमेला पुलाच्या चढणापूर्वी लोखंडी कमान लावण्यात येणार आहे. लवकरच त्याची अधिसूचना जारी केली जाईल. समांतर रस्त्यावर नो-पार्किंगचे फलक लागले, तरी दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. या बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एन.सी. जाधव यांनी दिली.पुलाचा पडला विसरकल्याण-डोंबिवलीतील अरुंद रस्त्यांवर बेशिस्तीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी केडीएमसीने नवे पार्किंग धोरण आखले होते. ते एकीकडे बासनात गुंडाळले असताना दुसरीकडे ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अधिसूचना काढण्याचाही विसर वाहतूक विभागाला पडला आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवीन ठाकुर्ली उड्डाणपूल बांधण्यातआला. परंतु, नियोजनाअभावी येथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे येथे नेहमीच पाहायला मिळते.पूल परिसरातील कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल. त्यासाठी दिवाळीनंतर अधिसूचना जारी करून अंमलबजावणी होईल, असे वाहतूक शाखेने सांगितले होते. परंतु, अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याने उड्डाणपुलाचा विसर पडला आहे का, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगdombivaliडोंबिवली