शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

नगरसेवकाच्या समर्थकांनी घातला रुग्णालयात हैदोस

By admin | Updated: March 23, 2017 01:21 IST

रुग्णालयातून घरी परतत असताना कारचा दुचाकीस्वारांना धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून भाजपा नगरसेवकाच्या समर्थकांनी दोघांना

डोंबिवली : रुग्णालयातून घरी परतत असताना कारचा दुचाकीस्वारांना धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून भाजपा नगरसेवकाच्या समर्थकांनी दोघांना रुग्णालयात घुसून लाकडी दांडूके आणि तलवारीच्या सहायाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री शिवम हॉस्पिटलमध्ये घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. डोंबिवलीतील नवापाडा येथे राहणारा प्रसाद कीर आणि अजय शेलार हे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रु ग्णालयातून घरी आपल्या दुचाकीने शेलार नाका येथून कारने परतत होते. मात्र रस्त्यात त्यांच्या कारचा धक्का एका दुचाकीला लागला. त्यामुळे त्यावर बसलेला तरुण आणि तरुणी जखमी झाले. लागलीच प्रसाद व अजय यांनी त्यांना नजीकच्या शिवम रुग्णालयात नेले. अजय याने या घटनेची माहिती आपले वडील व काँग्रस माजी नगरसेवक सदाशिव शेलार आणि मामा दशरथ म्हात्रे यांना कळवली. तर रुग्णालयाने या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना कळवली. त्याच दरम्यान जखमी झालेल्या मुलाने ही बाब भाजपा नगरसेवकाचे समर्थक विजय बाकडे यांनी कळवली. बाकडे याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. सदाशिव शेलार यांना रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाला मात्र, दशरथ म्हात्रे हे रुग्णालयात पोहचले. त्याचवेळी बाकडे आणि त्याचे साथीदार लाकडी दांडके , तलवार आणि काठ्या घऊन रुग्णालयात घुसले. प्रसाद, दशरथ म्हात्रे यांना त्यांनी शिवीगाळ करत रुग्णालयातील खुर्चा आणि लाकडी दांडक्याने मारहाण करू न तेथून पळ काढला. दशरथ म्हात्रे यांच्या डोक्याला सात टाके पडले आहेत. तर प्रसाद किरकोळ जखमी झाले. या वेळी तेथे तलवारही आणल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयात घडल्याने रु ग्णांसह डॉकटरही भयभीत झाले आहेत.दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात प्रसाद यांच्या फिर्यादीवरून लहू, करण उर्फ बाबू चौरिसया, रोहन ठाकूर ,सलीम, विजय बाकडे यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)