शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:58 IST

कोपर दिशेकडील उड्डाणपूल : अध्यादेशातील तांत्रिक घोळ, नियोजनाच्या अभावाचा फटका

अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने त्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी, असा आदेश गुरुवारी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढला होता. मात्र, अध्यादेशात अवजड वाहनांच्या यादीत शाळा आणि परिवहनच्या बसचाही चुकून उल्लेख झाल्याने तो वगळून सुधारित अध्यादेश काढण्यासंदर्भातील घोळ तसेच प्रवेशबंदीचे फलक न लागल्याने शुक्रवारी या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती.

आयआयटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार हा पूल कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी तत्काळ बंद करावा व त्याची डागडुजी करावी, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने २० मे रोजी केडीएमसीला पत्र देऊन पूल वाहतुकीस बंद करावा, असे सूचवले आहे. मात्र, महापालिकेने या कामासाठी निधी कोण देणार, असा सवाल केला होता. तर, ३० मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनेच खर्च करावा, अशी मागणी शिंदे यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली होती. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, खर्चाचे कोटेशन तसेच पुलाची पुन्हा आयआयटीच्या तज्ज्ञांनी पाहणी करावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, अद्याप ठोस हालचाल झालेली नाही. आयआयटीतज्ज्ञांना पत्र, स्मरणपत्रेही दिली. परंतु, त्यांच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

अवजड वाहनांसाठी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेकडून सूचना मिळताच महापालिकेने जूनमध्ये वाहतूक पोलिसांना पत्र देत त्याची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. वाहतूक विभागाने दोन दिवसांपूर्वी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. पण, त्याची अंमलबजावणी कशी करायची, या दृष्टीनेच शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे नियोजन सुरू होते.शाळा, परिवहनच्या बसबाबत संदिग्धता : वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार १२ टनांवरील वाहनांचा अवजड वाहनांमध्ये समावेश होतो. त्यात शाळा, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बस मोडत नाहीत. मात्र, वाळूचे ट्रक, डम्पर, सिमेंट, मालवाहू वाहनांचा समावेश होतो. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांना दिलासा मिळाला असला, तरी काही पालकांचा या पुलावरून वाहतुकीला विरोध आहे.