शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीला पावसाची दमदार हजेरी, गोविंदा पथकांमध्ये नाराजी

By अजित मांडके | Updated: September 7, 2023 15:19 IST

गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती.

ठाणे : हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज वर्तवला असताना, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे बरसने दुपारी बारा वाजेपर्यंत सुरूच राहिल्याने गोंविदांच्या आनंदावर विरजण पडले. ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथकांनी मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली. तरी काहींनी मानवी मनोरे उभारण्यास सुरुवात केली होती. 

दरम्यान दरवर्षी खिडकीतल्या ताई आता वाकू नका... दोन पैसे देतो मला तुम्ही भिजून टाका. ही धून वाजण्यापासून वरूनराजाने ठाण्यात धडकलेल्या गोविंदा पथकाना अक्षरशः चिंब करून टाकले. वरून राजाच्या आगमनाने मात्र आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. मात्र उत्साह कणभर कमी झाल्याचे दिसून आले नाही.        गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र गुरुवारी पहाटे पासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेआठ वाजण्याच्या ३० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत पुन्हा ३१.२३ मिमी पाऊस झाला आहे. अशाप्रकारे एकूण ६१.२३ मिमी पावसाने हजेरी लावल्याने दहीकाला आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर उमठल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

तरीपण सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्याकडे येण्यास सुरुवात केली. तर  काही पथकांनी ठाण्यात येत, मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या हजेरी लावल्याचे पाहण्यास मिळू लागले. त्याचबरोबर पडणाऱ्या पावसात मानवी मनोरे उभारताना पथक दिसत होते. हे मानवी मनोरे उभारताना त्याचा उत्साह पावसाप्रमाणेच शिगेला गेल्याचे दिसत होते.

टॅग्स :thaneठाणे