शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अपंगत्वावर मात करण्याची जिद्द भारी

By admin | Updated: May 31, 2017 06:03 IST

शहरातील के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील सिद्धार्थ ठोंबरे या विद्यार्थ्याने जिद्दीने अपंगत्वावर मात करून इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत

जान्हवी मोर्ये / लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील सिद्धार्थ ठोंबरे या विद्यार्थ्याने जिद्दीने अपंगत्वावर मात करून इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत ५२ टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशामुळे त्याच्या आई-वडिलांना विशेष आनंद झाला आहे.सिद्धार्थांचा जन्म पुण्यात झाला. सातमाशी जन्मलेल्या मुलाला जन्मताच मेंदूच्या पक्षघाताचा आजार होता. त्यामुळे त्याला अपंगत्व आले. जन्मत: अपंग असलेल्या सिद्धार्थचे चांगले संगोपन करण्यावर त्याच्या आई-वडिलांनी भर दिला. त्याची आई मंजिरी ही अकाऊंट मॅनेजर या पदावर होती. सिद्धार्थच्या जन्मानंतर त्याला वेळ देण्यासाठी तिने नोकरी सोडली. सिद्धार्थचे वडील संदीप हे मॅकेनिकल इंजिनिअर आहेत.सिद्धार्थवर सुरुवातीला फिजोथेरीपीस्ट व्यंकटेश मणूरकर व प्रल्हाद अंकमाची या डॉक्टरांनी उपचार केले. तसेच मुंबईच्या हाजीअली येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉ. निषाद ठाकूर यांनी त्याला प्रशिक्षण दिले. त्यामुळे सिद्धार्थ इमारतीच्या पायऱ्या स्वत: चढतो. मात्र घरात त्याला वॉकरची मदत घ्यावी लागते.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सिद्धार्थने चंद्रकांत पाटकर शाळेत घेतले आहे. शाळेत पहिलीपासून त्याला मदतनीस घेऊन परीक्षा द्यावी लागली. सिद्धी वालावलकर हिने दहावी व अकरावीचे पेपर लेखन केले आहे. त्याचे बारावीचे पेपर लेखन आरती डोलारे आणि सिध्दी यांनी केल. प्रयास प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी बेल्हे यांनी लेखन सुधारण्याचे प्रशिक्षण सिद्धार्थला दिले आहे. त्याचे अक्षर सुधारण्यासाठी त्याला मार्गदर्शन केले. सिध्दार्थ हा जास्त वेगाने लेखन करू शकत नाही. त्यामुळे त्याला लेखनिक घ्यावा लागतो. त्याला वाचलेले चांगले लक्षात राहते. त्याने १२ वी कला शाखेसाठी संस्कृत ही भाषा घेतली होती. त्याच्या परीक्षेचे केंद्र स्वामी विवेकानंद शाळेत आले होते. त्याला संस्कृत विषयात ४९ गुण मिळाले आहेत. त्याला सर्व विषयात ५२ टक्के गुण मिळाले आहेत.संस्कृतमध्ये एम.ए करण्याचे स्वप्न महाविद्यालयीन जीवनात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सिध्दार्थने सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी ‘वेदकालीन वाङ्मय’ या विषयावर संवाद साधला. त्याला संस्कृत या विषयात एम.ए करायचे आहे. संस्कृतमध्ये पदवी व पदव्युतर शिक्षण घेण्याची सोय डोंबिवलीत नसल्याने त्याचा शोध त्याची आई-वडील घेत आहेत.