शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:10 IST

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात ...

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कचराकुंडीमध्ये जमा झालेला कचरा रस्त्यावर पसरला आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर अनेक ठिकाणी जंतुनाशक पावडर किंवा औषध फवारणी होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत असताना शहरात असे चित्र आहे. अभियानाच्या सुरूवातीच्यावर्षी फक्त बक्षिसाची ५० लाखांची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने आटापिटा केला. मात्र त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्रीपत तांबे यांनी केली आहे. तसेच कचरा न उचलता पालिकेच्या लेखाधिकारी विभागाकडून काढण्यात येणारे कंत्राटदारांचे धनादेश तात्काळ रोखण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील विविध भागात गटार नाल्याचे व भुयारी गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या दुर्गंधीमुळे बाजारहाट करण्यासाठी येणाºया महिला व नागरिकांची गैरसोय होत आहे. कुंडीतील कचरा घंटागाडीतून नियमित उचलून डम्पिंग ग्राऊंडवर टाकणे आवश्यक आहे. असे असताना प्रभूआळी, बीजेपी दवाखाना,जैन मंदिर, बंगालपुरा, शिवाजीनगर, शांतीनगर, ईदगारोड, दर्गारोड, कल्याणरोड, शास्त्रीनगर, पद्मानगर,अंजूरफाटा ,गैबीनगर, म्हाडा कॉलनी,गायत्रीनगर, न्यू - आझादनगर अशा पालिकेच्या पाचही प्रभागात कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.