शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दहिवलीत आरोग्य यंत्रणा सज्ज; डेंग्यूने दोन महिलांचा मृत्यू, जिल्हा आरोग्य अधिका-यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:39 IST

डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

आसनगाव : ‘डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावालाभेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या गावात दोन दिवसांत डेंग्यूसदृश आजाराने संजीवनी पाटील (३०), मंदाबाई पाटील (४५) या दोन महिलांचा अचानक मृत्यू झाला.याच परिसरात राहणारा कैलास शिंगळे यास डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.दोन्ही महिलांची डेंग्यूची चाचणी केली असता तो नसल्याचा अहवाल मिळाला होता. मात्र, डेंग्यूसदृश लक्षणामुळे चांगल्या रुग्णालयात उपचार करूनही उपचारास प्रतिसाद न देता महिलांचा मृत्यू झाला.डॉक्टर व आरोग्य यंत्रणेस मृत्यूचे निश्चित कारण कळत नव्हते. या कारणाने आरोग्य यंत्रणा गोंधळलेली होती. शनिवारी आरोग्य पथकाने येथे तत्काळ हजेरी लावत योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना केल्या. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेंद्रूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेंद्रूणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली शेडगे यांनी मार्गदर्शन केले. तर, आरोग्य पर्यवेक्षक एस.डी. पगार यांनी घरांना भेटी देऊन जनजागृती केली.दहिवली गाव व परिसरातील ग्रामस्थांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धूरफवारणीची विनंती करण्यात आली आहे.- डॉ. बाळासाहेब सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारीदहिवली उपकेंद्रात २४ तास आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. ताप, मलेरिया, टाइफॉइड रु ग्णांची शोध मोहीम हाती घेतली आहे. मृत महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांकडून मृत्यूची कारणमीमांसा केली.- डॉ. महेश नगरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :thaneठाणे