शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयामुळे आरोग्यास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:48 IST

शहरातील सोनार आळी येथील सार्वजनिक शौचालय पुर्णत: मोडकळीस आलेले असल्याने तसेच शौचालयाला सेफ्टी टॅँकसुध्दा नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते.

जव्हार : शहरातील सोनार आळी येथील सार्वजनिक शौचालय पुर्णत: मोडकळीस आलेले असल्याने तसेच शौचालयाला सेफ्टी टॅँकसुध्दा नसल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. म्हणून मंगळवारी नागरीकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुमना पंत यांना लेखी तक्रार करुन शौचालय तोडण्याची मागणी केली आहे. तक्रारीची एक प्रत स्थानिक नगरसेवक कुणाल उदावंत यांनाही देण्यात आली होती. त्यांनीही तात्काळ कारवाई करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.या शौचालयाचा मैला गटारात सोडण्यात येत असल्याने परिसरात नेहमी उग्र वास येतो. त्यातच डूक्कर व कुत्रे स्वैरपणे फिरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, याबाबत वारंवार प्रसिध्दी माध्यमांद्वारे बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र याची दखल नगर परिषद प्रशासनाकडून न घेतल्याने नाराजी व्यक्त होत होती. या कारणामुळे परिसरातील नागरिकांनी आम्ही कर भरत असून आम्हाला दुर्गंधीच्या वातावरणात रहावे लागत असल्याची तक्रार केली होती. तसेच, शौचालयाच्या बाहेर मोकळी जागा असुन परीसरातील रहीवाशी तेथे कचरा टाकत आहेत.परिषदेची घंटागाडी नियमित येऊन घरोघरून कचरा उचलून जाते मात्र, सोनार आळीतील काही बेजबाबदार कुटुंब उघड्यावर कचरा टाकत आहेत. तसेच मुख्य रस्त्या शेजारची गटारे काही ठिकाणी उघडी असल्याने अपघाताचा धोका वाढतो. एकाच वेळी दोन वाहने समोरासमोर आल्याच पेच वाढत असल्याने नगर परिषदेने ती झाकावी अशी मागणी केली जात आहे. तसेच शौचालयाच्या शेजारी छोटीसी गल्ली आहे मात्र, त्यातही शौचालयाचे बांधकाम करून प्रशासनानेच अतिक्रमण केलेले आहे.शहराला स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळाले असून लाखो रुपए निधी मिळालेला आहे मात्र, सोनार आळीतील सेफ्टी टाकी नसलेल्या हा सार्वजनिक शौचालयाचा वापर कसा काय होतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या शौचालयाचा वापर कुणीही करीत नसल्याने तो तात्काळ जमीनदोस्त करण्याची सामूहीक मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सदर बाब ही आरोग्यास धोकादायक असून गंभीर आहे, त्यामुळे मी तात्काळ मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत सुचना केल्या आहेत अशी माहिती नगरसेवक कुणाल उदावंत यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :palgharपालघर