शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी झुंज देत तो झाला दहावी पास

By admin | Updated: June 14, 2017 02:57 IST

वेगवेगळ््या अडचणींवर मात करत, प्रचंड कष्ट करत दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचतो. पण सातत्याने कॅन्सरशी

- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : वेगवेगळ््या अडचणींवर मात करत, प्रचंड कष्ट करत दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचतो. पण सातत्याने कॅन्सरशी झुंज देत आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्याने खचून न जाता परीक्षा देणाऱ्या डोंबिवलीच्या सागर परमार या विद्यार्थ्याने दहावीत ७८ टक्के गुण मिळवत या आजारालाच वाकुल्या दाखवल्या. रोज पेपर दिल्यानंतर रेडिएशन घेत, प्रचंड थकव्यावर मात करत त्याने त्याही अवस्थेत पेपर दिले आणि जिद्दीने यश खेचून आणले. सागर हा डोंबिवली पश्चिमेत जुन्या डोंबिवली परिसरात राहतो. तो ज्युनिअर केजीपासून चंद्रकांत पाटकर शाळेत इंग्रजी माध्यमात शिकतो. सहावीच्या परीक्षेनंतर सुट्टी सुरू असतानाच त्याला कॅन्सरची लागण झाली. पायाला कॅन्सर झाला होता. त्याला सतत उपचारासाठी जावे लागत असल्याने सातवीची परीक्षा देता आली नाही. घरी अभ्यास करून त्याने थेट आठवीची परीक्षा दिली. आठवीत पुन्हा कॅन्सरचा जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला नववीची परीक्षा देता आली नाही. दोन वर्षे तो नववीचा अभ्यास करत राहिला. पण जिद्द सोडली नाही. त्याने दहावीचा टप्पा गाठला. दहावीच्या परीक्षेला एक दिवस शिल्लक असताना त्याला बे्रन टयूमर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. परीक्षा सुरू असतानाच त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. दुपारी दोनला पेपर संपला की तो रेडीएशनसाठी टाटाला जात होता. या उपचारानंतर त्याला प्रचंड थकवा जाणवत असे. त्यामुळे आजारपणापूर्वी केलेल्या अभ्यासाची केवळ उजळणी करण्यापलिकडे त्याच्या हाती काही नव्हते. एकढ्या त्रासानंतरही त्याने एकही पेपर चुकविला नाही. उपचारातही खंड पडू दिला नाही. त्याला इंग्रजीत ७२, गणितात ७१, मराठीत ७०, हिंदीत ८५, सामाजिक विज्ञानात ८४ आणि सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीत ८१ गुण मिळाले. चांगले गुण मिळतील, असा विश्वास त्याला वाटत होता. त्यामुळे ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सागरचे वडील किशोर फोटोग्राफर आहेत, तर आई हिना गृहिणी आहेत. आईने सागरची खूप काळजी घेतली. त्याला पूरक आहार दिला. त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अमिता भाटिया यांनी सागर व त्याच्या आई-वडिलांचे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले. त्याचा त्याला खूप उपयोग झाला. आजारपणात अभ्यास करुन परीक्षा दिली नाही तरी चालेल, असे सांगून त्याच्यावर आई-वडिलांनी कोणतेही दडपण आणले नव्हते. पण सागरने कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, असे मनाशी ठरवले होेते. यशात शाळा, आई-वडील आणि डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे सागरने सांगितले. त्याला एमबीए किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. प्रकृतीच्या सुधारणा तपासण्यासाठी केलेल्या त्याच्या चाचण्यांचा अहवाल महिनाभरात मिळणार आहे.