शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

‘तो’ पेरतोय पर्यावरण रक्षणाचे ‘बीज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 06:34 IST

पिशव्यांमध्ये सीडबॉल्स; दुकानांत करणार प्रसार

ठाणे : पर्यावरणाची हानी हा सध्या कळीचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. मात्र, कुणालाही या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वृक्षलागवडीचे अनेक जण कार्यक्रम करतात, पण ते फोटोसेशनपुरतेच मर्यादित राहतात. ही उदासीनता दूर करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील चासोळे येथील चंद्रकांत राऊ त याने नामी शक्कल लढवली आहे. यासाठी त्याने विशिष्ट जागी कप्पा असलेल्या कागदी पिशव्या बनवून त्यात सीडबॉल्स ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मुरबाडमधील पर्यटनस्थळावरील दुकाने, टपऱ्यांमध्ये या पिशव्या ठेवण्यात येणार असून वापरानंतर त्या फेकताच पावसाळ्यात त्यातील बिया रुजतील, अशी त्याची संकल्पना आहे.पर्यावरण दिनाचे निमित्त साधून वृक्षारोपण, निसर्ग राखण्याची शपथ देण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले. पावसाळ्यात शहरी पर्यटक मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट, नाणेघाट तसेच हरिश्चंद्र गड, भैरव गड व अन्य धबधब्यांवर धाव घेतात. मात्र, तोपर्यंत त्यांना पर्यावरणाचा विसर पडलेला असतो. प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, दारूच्या बाटल्या, थर्माकॉलच्या डिश तिथेच फेकून पर्यावरणाचा ºहास करतात.हरित क्षेत्र वाढावे, यासाठी विविध संस्थाही पुढाकार घेत आहेत. मागील वर्षी ठाण्यातील प्राणिक आरोग्य सेंटरने फळांच्या बिया असलेले सात हजार सीडबॉल्स येऊर आणि माळशेज घाट परिसरातील जंगलांमध्ये टाकले होते. हे सीडबॉल्स प्राणिक आरोग्य सेंटर व प्राणिक हिलिंग ग्रुप, मुरबाड यांनी चासोळे गावातून बनवून घेतले होते. याच गावातील चंद्रकांतने या उपक्रमासाठी वर्षभर काय करता येईल, याचा विचार सुरू केला. त्याचदरम्यान राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाली. चंद्रकांतला कागदी पिशव्यांच्या तळाशी हे सीडबॉल्स ठेवण्याची कल्पना सुचली. प्रायोगिक तत्त्वावर सीडबॉल्स असलेल्या कागदी पिशव्या त्याने बनवल्या आहेत. पावसाळ्यात माळशेज घाट परिसरात थाटली जाणारी दुकाने वा टपऱ्यांमध्ये या पिशव्या ठेवण्याचा त्याचा मानस आहे. पर्यटकांनी पिशव्यांचा वापर केल्यानंतर त्या उघडवर फेकल्या तरी पर्यावरणाला त्याचा धोका होणार नाही. १०० सीडबॉल्समधील १० बिया रुजल्या तरी झाडांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे त्याने सांगितले.मुरबाडमध्ये जानेवारी २०१९ ला झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिवळे कॉलेजच्या चंद्रकांत, स्वाती कोर, स्वप्नाली अहिरे या विद्यार्थ्यांनी या पिशव्यांची कल्पना माडंली. मान्यवरांनी त्यांच्या या पिशव्यांची विशेष दखल घेतली होती.सीडबॉल्स म्हणजे काय?सीडबॉल्स म्हणजे फळबिया असलेला मातीचा चेंडू. विविध झाडांच्या बिया माती, शेणखत आणि गांडूळ खतच्या गोळ्यामध्ये भरल्या जातात. उघड्यावर नुसत्याच टाकलेल्या बिया पाण्याबरोबर वाहून जाण्याची भीती असते. पण, सीडबॉल्स सहज मातीत रुजू शकतील.मुरबाड तालुक्यातील जंगलांमध्ये जांभूळ, मोह, आवळा, आंबा, खैर, गुलमोहर, बेहडा आदी प्रकारची झाडे आहेत. त्यामुळे याच झाडांच्या बियांपासून सीडबॉल्स बनवले आहेत. नैसगिकरीत्या या बिया रुजतील, असे चंद्रकांत म्हणाला. वनविभागाचे अधिकारी तुळीराम हिरवे, शिक्षक विराज घरत यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :environmentवातावरण