शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करताना त्याने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

कल्याण : ओव्हरटेक करताना मंधाता मिश्रा या बाईकस्वाराचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी ...

कल्याण : ओव्हरटेक करताना मंधाता मिश्रा या बाईकस्वाराचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) दुपारी २.३०च्या सुमारास पूर्वेतील तिसगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

अपघातानंतर कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह विच्छदेनासाठी पाठविला. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यातून दिसून येत आहे की, रिक्षा आणि ट्रकच्या मधून जाताना मंधाता याला अपघात झाला. रिक्षाला ओव्हरटेक करून तो पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यात त्याची बाईक घसरली. ट्रकच्या मागच्या चाकाखाली तो सापडून चिरडला गेला. मंधाता डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी असून, त्याचा पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. अपघात झाला त्यावेळी तो नक्की उल्हासनगरला कशासाठी जात होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी ट्रकचालक मोतीलाल यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती कोळसेवाडीचे पोलीस अधिकारी डी. गोळे यांनी दिली.

------------