शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जलमित्राचा सावरकर पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: May 29, 2016 02:48 IST

सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच

ठाणे : सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच प्रभाग क्र. २ चे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. अशा या जलमित्राच्या कार्याची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेत त्यांना वीर सावरकर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे, तर गळतीचे प्रमाण ४५ टक्कयांच्या आसपास आहे. धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन पालिकेने केले आहे. डुंबरे यांनी प्रत्येक विहिरीचे एक कनेक्शन जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दिले आहे. यामुळे परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक रहिवाशांना २४ तास विहिरींचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय, पाणीकपातीच्या काळात येथील रहिवासी पाण्याचा साठा करून ठेवत होते. परंतु, आता या पाण्यामुळे पाण्याचा साठा करण्याचीही गरज त्यांना भासत नाही. त्यांच्या याच कामाची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेतली असून शनिवारी त्यांचा वीर सावरकर पुरस्कार देऊन सन्मान केला. १२८ विहिरींची सफाई- शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ वापरात आहेत, तर २१६ विहिरी वापरात नाहीत. पालिकेने आता शहरातील त्यांची सफाई मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत १२८ विहिरींची सफाई केली आहे.- पालिकेच्या निधीची वाट न बघता डुंबरे यांनी बायर इंडियाच्या मदतीने आझादनगर भागातील चार विहिरींची सफाई करून घेतली आहे. सफाई झाल्यावर आरसीसी टाक्या बसवून या प्रत्येक विहिरीवर नळ लावले आहेत.