शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादावरून भिवंडीत हत्या, पत्नीसमोर पतीवर केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:04 IST

भिवंडी :शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून काल सायंकाळी सव्वासहा वाजता अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची ...

ठळक मुद्देमृत आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज व अफरोजचे बांधकामभरदिवसा शांतीनगर भागातील रस्त्यावर चाकून केली हत्याआरोपी फिरोजला लोकांनी पकडून दिले पोलीसांच्या ताब्यात

भिवंडी:शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून काल सायंकाळी सव्वासहा वाजता अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची हत्या करण्यात आली.ही हत्या त्याच्या पत्नीसमोर केल्याने परिसरांत दहशत निर्माण झाली असून या घटनेच्या वेळी परिसरांतील लोकांनी हल्लेखोरांतील एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.मोहम्मद आवेश उर्फ राजू अन्सारी (२५)असे मयत युवकाचे नांव असून तो पिराणीपाडा रहेमते मदिना मशीदजवळ आपल्या कुटूंबासह रहात होता. तो काल रविवार रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता दुचाकीवरून पत्नी कुलसुम व मुलासह भाजी आणण्याकरीता मार्केटकडे जात होता. तेंव्हा त्यांच्या मागून अफरोज बिलाल अन्सारी हा रिक्षातून त्यांचा पाठलाग करीत आला.मोहम्मद आवेशची दुचाकी अमजदीया हायस्कुलच्या बाजूला आली असता त्याने रिक्षाने मागून धक्का मारून दुचाकीवर बसलेल्या तिघांना खाली पाडले. त्याच वेळी रिक्षातून बाहेर येऊन अफरोज याने शिवीगाळी करीत हातातील चाकूने धमकावीत आवेश उर्फ राजू अन्सारी याच्या छातीवर,पोटावर,हातावर व पायावर वार केले.त्याचवेळी तेथे अफरोजचा भाऊ फिरोज बिलाल अन्सारी याने तेथे मदतीकरीता जमलेल्या लोकांना ‘कोई बिचमें नही आना’अशी धमकी देत मदतीपासून परावृत्त केले. या घटनेनंतर जखमी आवेश यांस इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत उपचारास आणले असता तेथील डॉक्टरांनी आवेश मृत झाल्याचे घोषित केले. तर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी फिरोज यांस पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.मृत मोहम्मद आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज व अफरोज हे दोघे भाऊ अतिक्रमण करून बांधकाम करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होते. त्यावादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अफरोज व फिरोज बिलाल अन्सारी या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन फिरोज यांस अटक केली आहे.या घटनेने परिसरांतील लोकांमध्ये घबराट पसरली असुन हत्या करणाऱ्या दोघा भावांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून