शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हाजुरी, लुईसवाडीत मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:40 IST

ठाणे महापालिकेतर्फे बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून बृहन्मुंबई महापालिकेने मान्यता दिल्याने येत्या आठवडाभरात नवीन जलजोडणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.३० वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून २२.५० दशलक्ष लीटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्यातक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्तरावर गेल्या वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी महापालिकेने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून ३ कोटी १६ लाखांची अनामत रक्कमही भरली आहे. दरम्यान, जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे.>ठाण्यात आज पाणीकपातठाणे महापालिकेतर्फे सर्व्हिस रोड, धर्मवीर मार्ग (डी-पॉर्इंट) या ठिकाणी बीएमसी जलवाहिनीवर जलमाफक बसविणे तसेच हाजुरी येथील रॉ वॉटर पाणीपुरवठा बंद करण्याकरिता क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ पर्यंत शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्वत:च्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून बुधवारी बंगला वॉटर डिस्ट्रिक्ट मधील नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर, तसेच गावदेवी वॉटर डिस्ट्रिक्टमधील बी कॅबिन, दादा पाटील वाडी, स्टेशन परिसर, चेंदणी कोळीवाडा, राम मारु ती रस्ता आदी भागांत पाणी नसेल.