शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

फेरीवाला धोरणाची नव्या वर्षात होणार अंमलबजावणी, तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समितीच पाहणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:54 IST

ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत.

ठळक मुद्देनव्या वर्षात फेरीवाला धोरण लागू होण्याची शक्यताशहरात सात हजार फेरीवालेशिल्लक राहिलेल्या फेरीवालांचा करणार नव्याने सर्व्हे

ठाणे - फेरीवाला धोरणासंदर्भात उच्च न्यायालयाने ज्या महापालिकांनी यापूर्वी समिती गठीत केली असेल त्यानुसारच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका आता २०१४ मध्ये गठीत केलेल्या समितीनुसार काम करणार आहे. याबाबत आयुक्तांकडे तसा संबधींत विभागाकडून पत्र व्यवहार करण्यात आला असून आता लवकरच फेरीवाला धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार शहरात सुमारे ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. पालिका आता, या फेरीवाल्यांकडून रजिस्ट्रेशनची फी आकारुन त्यांना जागा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेने मागील साडेतीन वर्षात शासनाच्या बदललेल्या नियमानुसार दोन वेळा सर्व्हे केला. त्यानंतर आता फेरीवाला समिती गठीत करण्यासाठीचा आध्यादेश पुढे आल्याने पालिकेने त्याची तयारी सुरु केली होती. या समितीमध्ये जवळ जवळ विविध प्रकारचे सदस्य मिळाले असून ही समिती देखील गठीत करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. आता फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यासाठी, शासनाने अ‍ॅप देखील देऊ केला आहे. परंतु अद्यापही तो अ‍ॅप पालिकेला मिळालेला नाही.दरम्यान आता उच्च न्यायालयानेच शासनाचे कान टोचले असून ज्या महापालिकांनी यापूर्वी सर्व्हे केला असेल आणि ज्यांनी समिती गठीत केली असेल त्यानुसारच पुढील कामकाज केले जावे असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ठाणे महापालिकेने २०१४ मध्ये गठीत केलेली समिती पुर्नगठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच समिती आता काम पाहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या समितीची बैठक घेण्याबाबत संबधींत विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र देखील दिले आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसात या समितीची बैठक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.दरम्यान फेरीवाल्यांचा यापूर्वीच बायोमेट्रीक सर्व्हे झालेला असून त्यानुसार शहरात आजच्या घडीला ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. तोच सर्व्हे आता ग्राह्यधरला जाणार असून, शहरात जे उर्वरित शिल्लक राहिलेले फेरीवाले असतील त्यांचा सर्व्हे केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी शासनाच्या अ‍ॅपची मदत घेतली जाणार आहे. एकूणच नव्या वर्षात आता फेरीवाला धोरण अंतिम होऊन त्यानुसार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त