शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले-व्यापारी संघर्ष पेटला

By admin | Updated: March 30, 2017 06:32 IST

सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे

ठाणे : सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. परंतु, आता तेथील व्यापाऱ्यांविरोधात फेरीवाले एकवटले असून त्यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढून सुभाष पथ मार्ग फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसे केले नाही तर पुढील महिन्यात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता व्यापारी विरुद्ध फेरीवाला असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरातील सुभाष पथ ते जांभळीनाका या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने तेथून एसटी आणि टीएमटीच्या बसेस जाऊ लागल्या आहेत. परंतु, या भागात रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसत असल्याने त्याचा त्रास येथील व्यापाऱ्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी व्यापारी आक्रमक झाल्यानंतर तेथे २४ तास पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाचा जागता पहारा असतो. त्यांच्यामार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात असून ते नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात डम्प केले जात आहे. केंद्राच्या निकषानुसार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही. त्यामुळे हे धोरण तत्काळ राबवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी बुधवारी काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. सुभाष पथ भागातील शेकडो फेरीवाले त्यात सहभागी झाले होते. फेरीवाला धोरणाच्या अनुषगांने पालिकेने नोंदणी करून घेतली आहे. त्यानुसार, आम्हीदेखील या नोंदणीत सहभागी होऊन रक्कमदेखील भरलेली आहे. परंतु, तरीदेखील आमच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला. तसेच सुभाष पथमार्गे जाणारी बससेवा बंद करून पुन्हा जुन्या मार्गाने सुरू करावी. जप्त केलेले साहित्य फेरीवाल्यांना तत्काळ मिळावे आणि सुभाष पथ परिसर फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी या वेळी फेरीवाल्यांनी केली. परंतु, या मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्यानंतर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)