शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा धार्मिक स्थळांवर लवकरच पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:21 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश वेलरासू यांनी सोमवारी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश वेलरासू यांनी सोमवारी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. या कारवाईच्या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्तही पुरवला जाईल, असे आश्वासनही पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले.केडीएमसी हद्दीतील रेल्वे, वन, एमएमआरडीए आणि महापालिकेच्या जागांवर असलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात बैठक झाली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वन विभाग, रेल्वे, एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.केडीएमसी हद्दीत बेकायदा ४४ धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी १२ धार्मिक स्थळे रेल्वे प्रशासनाच्या, तीन वन विभागाच्या तर तीन एमएमआरडीएच्या हद्दीत आहेत. केडीएमसीने आपल्या हद्दीतील ११ धार्मिक स्थळांवर यापूर्वीच कारवाई केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित धार्मिक स्थळे तातडीने तोडण्याचे आदेश प्रभाग क्षेत्र अधिकाºयांना वेलरासू यांनी दिले. या कारवाईसाठी आवश्यक बंदोबस्त पुरवला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिंदे यांनी सांगितले.रेल्वे, एमएमआरडीए आणि वन विभागाच्या जागेवर बेकायदा उभ्या असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत संबंधित प्राधिकरणाला पत्राद्वारे कळवावे, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.सोसायट्यांनीही परवानगी घेणे आवश्यकमहापालिका हद्दीत २९१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आहेत.४४ हजार घरांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या व्यतिरिक्त खाजगी मंडळेही सोसायट्यांच्या आवारात गणेशमूर्तीची स्थापना करतात, अशा मंडळांनीही परवानगी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त शिंदे यांनी केले आहे.गणेशोत्सव मंडळांना एक खिडकीद्वारे परवानग्यागणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेद्वारे सर्व परवानग्यादेण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये अग्निशमन, वाहतूक विभाग, केडीएमसी, पोलीस आणि महावितरण या कार्यालयाकडून सर्व परवानग्या एकत्र करून महापालिका हद्दीतील आठ पोलीस ठाण्यांमधून या परवानग्या दिल्या जाणार आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या परवानग्यांसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज करावयाचे आहेत. १३ आॅगस्टपासून या परवानग्या देण्याचे काम सुरू होणार आहे. अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी या परवानग्या मंडळांना दिल्या जातील....अन्यथा गुन्हे नोंदवणारउच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवर मंडप उभारून उर्वरित पाऊण जागा रहदारीसाठी खुली ठेवणे आवश्यक आहे. मात्र, काही मंडळे एक चतुर्थांशपेक्षा जास्त जागा व्यापतात. त्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. यावर उपाय म्हणून दोन पोलीस ठाणे मिळून एक असे चार भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. भरारी पथके मंडपांची तपासणी करणार आहेत.या पथकात वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी व पोलीस प्रतिनिधी असतील. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास दोषी मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.