ठाणे - मागील काही महिने बंद झालेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई सोमवार पासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यानुसार हाजुरी येथील ३६ बांधकामावर तर हरदास नगर येथील एका बेकरीचे बांधकाम पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले आहेत. सुरवातीला या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला. परंतु पालिकेने पोलीस बळाचा वापर करुन ही कारवाई फत्ते केली. ठाणे महापालिकेच्या वतीने सोमवार पासून रस्ता रुंदीकरणाची कारवाई पुन्हा एकदा सुरु केली आहे. त्यानुसार हाजुरी येथील रस्त्यालगत असलेल्या ३५ बांधकामांवर तर हरदारनगर येथील एका बेकरीचे बांधकाम सोमवारी पालिकने तोडली. तर विद्यापीठ उपकेंद्र रस्ता, वेदांत हॉस्पीटल, आनंदनगर आणि वागळेमधील रस्ता क्रमांक १६ आणि २२ तसेच आयटीआयकडे जाणाºया रस्त्यालगतच्या बांधकामांचे सर्वेक्षण पालिकेने केले असून ही बांधकामे मंगळवारी, तोडली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. या कामांंमुळे शहरातील मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत पर्यायी रस्ते उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन वर्षापासून पालिकेने अशा प्रकारची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत स्टेशन परिसर, पोखरण १, २, हत्तीपुल, घोडंबदर सर्व्हीस रोड, बाळकुम आदींसह शहराच्या इतर भागात कारवाई करण्यात आली आहे. या रस्ते रु ंदीकरण मोहिमेमुळे मुख्य रस्त्यांना अंतर्गत रस्ते जोडले जाणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. नितीन कंपनी येथून वागळे इस्टेटकडे जाणारा रस्ता आणि एलबीएस मार्ग हे दोन रस्ते हाजुरीमधील रस्ते रुंदीकरणामुळे जोडले जाणार आहेत. द्रुतगती महामार्गावरील चिरागनगर येथील सेवा रस्ता आणि पोखरण रस्ता क्र मांक दोन असे हरदासनगर येथील रुंदीकरणामुळे जोडले जाणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत हाजुरीतील ३५ बांधकामावर टाकला हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:31 IST
ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून त्या अनुषंगाने सोमवारी हाजुरी येथील ३५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. तसेच हरदास नगर येथील एका बेकरीचे बांधकामही तोडण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणाअंतर्गत हाजुरीतील ३५ बांधकामावर टाकला हातोडा
ठळक मुद्देउर्वरीत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडारुंदीकरणामुळे अंतर्गत मार्ग जोडले जाणार