शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नौपाड्यातील रहिवाशाला मारहाण करणाऱ्या हसमुख शहाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 05:35 IST

राहुल पैठणकर यांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण करणारा विकासक हसमुख शहा याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केलीे.

ठाणे : राहुल पैठणकर यांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण करणारा विकासक हसमुख शहा याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केलीे. त्याने स्वत:हून नौपाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत लिफ्टच्या वादातून ११ सप्टेंबर रोजी शहा -पिता पुत्रांनी पैठणकर यांना जबर मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी शहाविरुद्ध १६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. तसेच मनसेचे ठाणे- पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफीही मागायला भाग पाडले. तर दोघांच्यातील वाद हा वैयक्तिक असल्याचे गुजराथी समाजाने एका पत्रकार परिषदेद्वारे मंगळवारी जाहीर केले. दरम्यन, ठाणे न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर शहाची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.>मालमत्ता मराठी व्यक्तींनाच विकाशहा प्रकरणानंतर अनेक ठाणेकरांनी मनसेच्या कार्यालयात येऊन काही तक्रारीही केल्या. काही परप्रांतीय हे जाणूनबुजून मराठी व्यक्तीला घर, दुकान, जमीन अशा मालमत्ता विक्री किंवा भाड्याने देत नाहीत. त्यासाठी ते आपल्या समाजाला प्राधान्य देतात. तसेच मराठी व्यक्तींनीही आपल्या मालमत्तांची विक्री करताना मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी बुधवारी केले. या वेळी ‘आपलं घर - मालमत्ता मराठी माणसालाच विका!’, ‘आपले ठाणे-मराठी ठाणे’ अशा आशयाच्या फलकांचेही मोरे यांनी विष्णुनगर येथील मनसेच्या मुख्यालयासमोर अनावरण केले.