शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 12, 2023 15:24 IST

डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली.

ठाणे : अहमदनगरच्या हर्ष घाडगेने साडे सात गुणांची कमाई करत रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, सीकेपी सोशल क्लब आणि सिकेपी ज्ञातीगृह आयोजित रोचेस महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. साडे सात गुण मिळवूनही सरस कामगिरीत मागे पडलेल्या दृश्य शेट्टीला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. शेवटच्या नवव्या फेरीत पहिल्या पटावर हर्षने वैभव बोरसेला मात दिली. 

डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली. दुसरी पटावर स्पर्धेतील आकर्षण ठरलेल्या नागपूरच्या वेदिका पालला मुंबई उपनगरच्या दर्श शेट्टीने हरवले. या लढतीत वेदिकाने दर्शला चांगली झुंज दिली. दर्शने पाच प्यादी राखून वझीर मिळवल्यावर वेदिकाने पराभव मान्य केला. अन्य लढतीत मुंबई उपनगरच्या अर्णव खेर्डेकरने प्रथमेश गावडेला मात देत तिसरा क्रमांक संपादन केला. ठाण्याच्या आदित्य बारटक्केने पुण्याच्या अभिजित जोशीला बरोबरीत रोखत पहिल्या दहात जागा मिळवली. 

स्पर्धेतील इतर विजेते : ७ वर्षाखालील मुले : आयुष जगताप (पुणे), लक्ष दिघे, शिखर नानावटी ( दोन्ही मुंबई उपनगर). मुली : मिशका त्रिपाठी (ठाणे), गिरीशा पै (मुंबई उपनगर),भूमी धगडाधगे (नंदुरबार).९ वर्षाखालील मुले : अर्जुन सिंग (मुंबई उपनगर), निर्वाण शाह (मुंबई शहर), मिथुन आर (रायगड).मुली : भूमिका वाघेला ( छत्रपती संभाजी नगर), अनाहीका सिन्हा (ठाणे ), आश्वि अगरवाल (मुंबई उपनगर).११ वर्षाखालील मुले : आर्यन वाघमारे (ठाणे), वेदांत गोगरी, हृदय मणियार ( दोन्ही मुंबई शहर ).मुली : हिया पाटील ( ठाणे), हिरण्मयी कुलकर्णी, महूआ देशपांडे ( दोन्ही मुंबई उपनगर).

टॅग्स :Chessबुद्धीबळthaneठाणे