शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

येऊरमधील बेकायदा बारमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 02:03 IST

येऊरचा निसर्गरम्य परिसर, घोडबंदरचा सर्व्हिस रोड आणि खाडीकिनारा तसेच कोठारी कम्पाउंड परिसरातील हॉटेल्स, हुक्कापार्लर आणि लाइव्ह ऑर्केस्ट्रा-बारच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

ठाणे : येऊरचा निसर्गरम्य परिसर, घोडबंदरचा सर्व्हिस रोड आणि खाडीकिनारा तसेच कोठारी कम्पाउंड परिसरातील हॉटेल्स, हुक्कापार्लर आणि लाइव्ह ऑर्केस्ट्रा-बारच्या वाढत्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेने संयुक्तरीत्या कारवाई करण्याची मागणी दहिसरच्या कांदरपाडा येथील दक्ष नागरिक संघटनेने केली आहे.ही आस्थापने शासकीय जमिनींवर आहेत. त्यांना अग्निशमन दलाचे प्रमाणपत्रही मिळू शकत नाही. उत्पादन शुल्क विभागदेखील अशा ठिकाणी मद्यविक्री करू देत नाही, तरीदेखील सर्रासपणे बेकायदेशीरपणे मद्यविक्री केली जाते. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच इथे अशा प्रकारे त्याचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. संरक्षित वनक्षेत्र असलेल्या येऊर परिसरात रात्री प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तरीही हे नियम पायदळी तुडविले जात आहेत. घोडबंदर रोड परिसरातील शेतजमीन आणि वनविभागाच्या जागेवर दिवसाढवळ्या हे अतिक्रमण झाले आहे. लाइव्ह ऑर्केस्ट्रा बार सुरू याठिकाणी ठाणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना घोडबंदरच्या सेवारस्त्यावर आणि खाडी किनाऱ्यालगतची सरकारी, खासगी आणि शेत जमिनीवर मनमानी पद्धतीने बांधकामे सुरू आहे. त्यातही लाइव्ह ऑर्केस्ट्रा या बारला अद्याप शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही ते सुरू आहेत. येऊर आणि उपवन भागात आठ तर कासारवडवली भागात ११ आणि कोठारी कम्पाउंडमध्ये पाच बार नियमांचे तसेच कोरोनावरील सामाजिक अंतराचे उल्लंघन करीत सुरू असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.

टॅग्स :thaneठाणे