शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:18 IST

घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले.

- पंकज रोडेकर घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले. यासंदर्भात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...अपहरणाचे गुन्हे ठाण्यात किंवा मुंबईत दाखल नसताना ते कसे उघडकीस आणले?ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस दलातील शाखांना अपहरण यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यातूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे, दिल्लीतील मुलीचा विश्वास संपादन केला. त्यातून तिने सुरुवातीला वेगवेगळी खरी वाटेल अशी माहिती देताना, आईवडील नसल्याचे सांगितले. मात्र, शोध घेतल्यावर आईवडील असल्याचे समोर आले. तर, राजस्थान येथील मुलांबाबत स्थानिक पोलिसांना ही मुले ठाणे किंवा नवी मुंबई यासारख्या परिसरांत आहेत, असे समजले होते. त्यानुसार, त्यांचा शोध घेऊन हे गुन्हे उघडकीस आणले.चोरी, हत्या किंवा दरोडा यापेक्षा अपहरण गुन्ह्याचा तपास किती वेगळ्या प्रकारे करावा लागतोे?चोरी, हत्या किंवा दरोडा यासारख्या गुन्ह्यात नेमकी काहीतरी कारणे असतात. मात्र, या गुन्ह्यात तशी काही कारणे नसतात. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील हरवलेल्या मुलांची मिसिंग अशी नोंद न करता अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यातच, हा गुन्हा इतर गुन्ह्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. यामध्ये त्या मुलांचा प्रथम विश्वास संपादन करून त्यांना बोलते करावे लागते. त्यातून त्यांच्याकडून थोडी तरी माहिती मिळाली की, तो गुन्हा उघडकीस येतो.मुले का घर सोडून पळतात?घरची मंडळी लहान वयात लग्न लावून देतील. तसेच आपल्यापेक्षा लहान भावंडांवर आईवडील जास्त प्रेम करतात. तर, एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने मारण्याच्या भीतीने, घरातील पालकांची भांडणे, वडिलांचे व्यसन त्याचबरोबर प्रेमप्रकरण आदी कारणांतून मुले घर सोडतात.तुम्ही मुलांसह पालकांना काय सांगाल?मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. पालकांच्या दिवसेंदिवस मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच, कडक वागणूक यामुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून पळ काढतात. त्यामुळे पालकांनी पाल्यांमधील बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमताही लक्षात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा करू नये. त्यातच, पालकांनी आपल्या चुका पहिल्या सुधारल्या पाहिजेत.