शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हँगिंग टेडी, कपल्स शोपीसला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:07 IST

व्हॅलेंटाइन डेचे निमित्त : तरुणांची खरेदीसाठी उडाली झुंबड; उलाढालीमध्ये वाढ

डोंबिवली : व्हॅलेंटाइन डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्यासाठी मंगळवारी शहरातील दुकानांमध्ये तरुणतरुणींची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भेटवस्तू देण्यासाठी सर्व जण काहीतरी नावीन्य शोधत होते. हँगिंग टेडी असलेल्या टोपल्या आणि म्युझिकल कपल्स शोपीस खरेदी करण्यावर अनेकांचा भर होता, असे दुकानदारांनी सांगितले.

व्हॅलेंटाइन डे च्या आधी आठवडाभर चॉकलेट डे, रोझ डे, हग डे असे विविध दिवस साजरे केले जातात. परंतु, व्हॅलेंटाइन डे ला प्रेमवीरांकडून सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. वास्ताविक पाहता प्रेमा तुझा रंग कसा, असे जरी विचारले जात असले तरी प्रेमाचा रंग हा लाल, गुलाबी असाच असतो. या दोन रंगांना अधिक महत्त्व असते. त्याच आधारावर गिफ्ट बाजारात दिसून येत आहेत.

मात्र, दोन वर्षांपासून व्हॅलेंटाइन डे च्या गिफ्ट्सचा वेगळा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. पूर्वी शोपीस घेण्याकडे कल अधिक होता. हा ट्रेण्ड आता बदलत आहे. त्यांची जागा उपयोगी वस्तूंनी घेतली आहे. त्यामध्ये चेन, लेडिस पर्स, अत्तर, बे्रसलेट, कडे आणि रिंग आदींचा समावेश आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला त्या वस्तू उपयोगात आणता येतील, याचा विचार करून वस्तूंची खरेदी केली जात आहे. व्हॅलेंटाइन डे ला पूर्वी केवळ कॉलेज तरुणतरुणी मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू खरेदी करत असत. पण, आता शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध असे सर्वच वयोगटांतील व्यक्ती व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. त्यामुळे या व्यवसायातील उलाढाल दरवर्षी वाढत आहे. त्यामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची माहिती विक्रेते राजेश मुणगेकर यांनी दिली.ग्रीटिंगची मागणी घटलीविके्रते गोविंद कुमावत म्हणाले, व्हॅलेंटाइन डे च्या खरेदीला सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी हृदयाचा आकार असलेल्या उशा, टेडी, की-चेन, नाइट लॅम्प, लव्ह आकाराचे कॉफी मग, आकर्षक चॉकलेट बुके, गोल्डन रोझ आणि रेड रोझ असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत ग्रीटिंगची मागणी मात्र घटली आहे. आता भेटवस्तू दिल्या जातात. उपयोगात येतील अशाच वस्तूही खरेदी के ल्या जात आहेत. महाविद्यालयीन तरुणतरुणींपेक्षा विवाहित दाम्पत्यांमध्ये भेटवस्तू घेण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असल्याने भेटवस्तू घेण्यासाठी दुकानात गर्दी होत आहे.