शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:54 IST

ठाणे महापालिका त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन उभारणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे एक पाऊल आहे.

ठाणे : ठाणे महापालिका त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन उभारणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे एक पाऊल आहे. याकरिता सुमारे साठ लाख रु पये खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.प्रशासनाचा हा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे मांडून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावेत म्हणून हा उपक्र म किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. परिणामी सदस्यांनीही त्याला कोणती हरकत न देता मान्यता दिली आहे.आजघडीला ठाणे महापालिकेच्या एकूण ५५ बालवाडी, १२१ प्राथमिक शाळा २० माध्यमिक शाळा ७८ इमारतींमध्ये आहेत. शाळा इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर जेथे वॉशरूम आहे, तेथे हे हॅण्ड सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन लावण्याचा महापालिकेचा विचार आहे. यात मशिनसह सॅनिटायझर जेलचा पुरवठा करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ५८ लाख ८३ हजार २०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावला महासभेत नगरसेवक मंजुरी देतात का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.महापालिकेने आपल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील काही वर्षांपासून विविध उपक्र म राबवले आहेत. याचाच भाग सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने अभिनव प्रयोग करत आहेत.यात यंदापासून ‘शाळा आपल्या दारी’ प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यातच महापालिकेच्या सर्व शाळा लवकरच डिजिटल करण्यात येत आहेत. वर्गांमध्ये फळ्याची जागा ५५ इंचचा भव्य टचस्क्रि नचा एलईडी घेत आहे. तसेच साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी खास अ‍ॅपही तयार करण्यात येत आहे. पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांना ८ डिजी किट्स देण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या सहा, इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळांचा समावेश आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक नवनव्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत.प्रत्येकासाठी डिजीटल किटप्रत्येक इयत्ता व वर्गासाठी डिजीटल किट तयार करण्यात आला आहे. या संचात ५० विद्यार्थ्यांसाठी रिमोट, किबोर्ड, माऊस एलईडी टचस्क्रि नचा ५५ इंचचा फळा, संगणक, वेब कॅमेरा, एव्हुलेशन किट आदींसह इतर सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या