शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित कारागृह अधीक्षकाविरोधात अपहाराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:09 IST

शासकीय कामाच्या खर्चासाठी दिलेल्या निधीतील सुमारे ९ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : शासकीय कामाच्या खर्चासाठी दिलेल्या निधीतील सुमारे ९ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात वर्षभरात वेगवेगळे चार गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक व सध्या आर्थर रोड कारागृहात कार्यरत असलेले ज्योतीराम पवार (५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जाधव यांच्याविरोधात अपहार केल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, जाधव यांनी पेटी कॅशमधील पैसे खाजगी गाडीत डिझेल भरण्यासाठी वेळोवेळी घेतल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे त्यांनी सुमारे ९ हजारांचा अपहार केला असून हा प्रकार एप्रिल ते आॅगस्ट २०१६ दरम्यान घडला आहे. हे पैसे दबाव टाकून घेतल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.जाधव यांच्यावर याआधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यासह कारागृहात गाड्या घुसवणे, अ‍ॅट्रॉसिटी आणि आता अपहार असा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.