शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हणमंत जगदाळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:21 IST

राष्ट्रवादीच्या कारभारावर सडकून टीका : श्रेष्ठींवरही व्यक्त केली नाराजी

ठाणे : लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी आपल्याच पक्षाच्या विरोधात असहकार पुकारून गटनेतेपदाचा राजीनामा दिला. राष्टÑवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसून गटाच्या बैठकीत जे निर्णय होतात, ते बदलले जातात, असे सांगून काही ठरावही पक्षातील ज्येष्ठ मंडळी अचानकपणे बदलत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

तूर्तास त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी ते येत्या काळात भाजप किंवा शिवसेनेची वाट धरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्यात राष्टÑवादीला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेची छुपी मैत्रीगुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. २०१७ नंतर ठाणे महापालिकेत राष्टÑवादीचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. केवळ टेंडरसाठी छुपी मैत्री केली जात असून ती करायचीच असेल तर खुलेपणाने करावी, असा गंभीर आरोप त्यांनी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला. गटाच्या बैठकीत काही निर्णय घेतले जातात. मात्र, प्रत्यक्ष आयत्या वेळी ते बदलले जात असून राष्टÑवादी पक्ष केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.यासंदर्भात वारंवार विरोधी पक्षनेते, पक्षातील श्रेष्ठी यांच्याकडेसुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच साध्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरबाबत दुजाभावक्लस्टरचा प्रस्ताव होत असताना त्यामध्ये शास्त्रीनगरचा समावेश होता. मात्र, त्या प्रस्तावाच्या ऐवजी दुसराच प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यातून शास्त्रीनगरचे नाव वगळण्यात आले. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांची स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थायी समितीमध्ये राष्टÑवादीचे चार नगरसेवक जाणे अपेक्षित असताना केवळ या मंडळींच्या असलेल्या छुप्या मैत्रीच्या संबंधांमुळे तीनच सदस्य स्थायी समितीत गेले.कोणताही ठराव करताना अथवा पक्षाची भूमिका विशद करताना गटनेते म्हणून विश्वासात घेतले जात नाही. सत्ताधारी पक्ष व प्रशासनाचे उत्तम संबंध असताना स्वीकृत नगरसेवक म्हणून आपला एक नगरसेवक निवडून न येणे आदी मुद्यांना हात घालून त्यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना आरोपीच्या पिंजºयात उभे केले.पाच नगरसेवक गणेश नाईकांसोबत जाणारराष्ट्रवादी पक्ष सोडणार का, असा सवाल त्यांना केला असता, तूर्तास तरी तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, ते गणेश नाईक यांच्या संपर्कात असल्याची माहिती यानिमित्ताने समोर येत असून नाईक यांच्यासमवेत ते आणि त्यांचे इतर तीन सहकारी नगरसेवक आणि दिवा-कळव्यातील दोन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिवसेनेचीही फिल्डिंगमात्र, दुसरीकडे जगदाळे भाजपमध्ये न जाता शिवसेनेत यावेत, यासाठी शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी क्लस्टरचे आमिष दाखविले जात असून त्याच जोरावर त्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. 

सभागृहात आम्ही नेहमी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावलेली आहे. गटाच्या बैठकीत झालेले निर्णय बदलले जातात, असा जो काही आरोप आहे, तो चुकीचा आहे. वास्तविक, पाहता तुम्ही गटनेता होता, मग याविरोधात आवाज का नाही उठविला, पक्षाला बदनाम करण्याचे वारंवार काम आपण केले आहे. मागील १५ वर्षे आपण पक्षात विविध भूमिका बजावल्या असताना आज आपणच पक्षाला बदनाम करणे कितपत योग्य आहे.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपा