शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिधोकादायक इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:54 IST

उल्हासनगरमध्ये २३५ इमारतींना नोटिसा; महापालिकेने सुरक्षेची जबाबदारी झटकली

उल्हासनगर : महापालिकेने २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. शुक्रवारी मंदार अपार्टमेंट या अतिधोकादायक पाच मजली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करण्यात आली. धोकादायक इमारतींना नोटिसा देत जीवित आणि वित्तहानीस सर्वस्वी फ्लॅटधारक जबाबदार राहतील, असे सांगून जबाबदारी झटकली.उल्हासनगरात इमारती पडून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने २० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कारवाई काय झाली, याचा थांगपत्ताही महापालिकेला नाही. पालिकेने नेहमीप्रमाणे इमारतीचे सर्वेक्षण करून २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच धोकादायक इमारतींना नोटिसा देऊ न इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास रहिवासीच त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे नोटिसांत म्हटले आहे. महापालिकेने जबाबदारी झटकली असली, तरी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.महापालिकेने घोषित केलेल्या अतिधोकादायक इमारतीच्या यादीतील मंदार अपार्टमेंट ही पाच मजली इमारत पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शुक्रवारपासून इमारत पाडण्याचे काम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. सर्व प्रकारचा आढावा घेऊ न इतर अतिधोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय महापालिका घेऊ शकते, असे शिंपी म्हणाले. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धोकादायक इमारतीचा आकडा अत्यंत कमी आहे. धोकादायक इमारतीची संख्या एक हजारावर असल्याचा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. दोन वर्षांत ज्या इमारतीचे स्लॅब पडून बळी गेले आहेत, त्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे उघड झाल्याचे ते म्हणाले.आपत्कालीन व्यवस्थापन नाहीपावसाळ्यात इमारत पडून काही दुर्घटना घडल्यास पालिकेकडे आपत्कालीन व्यवस्थापनच उपलब्ध नाही. तसेच पूरग्रस्त नागरिकांना पालिका व खाजगी शाळेत ठेवण्याची वेळ महापालिकेवर अनेकदा आली आहे.यातून धडा न घेता पालिकेचे येरे माझ्या मागल्या सुरू असल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे. ७०० कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन नसल्याबाबत टीकेचा सूर उमटतआहे.