शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:55 IST

विम्को नाका ते गांवदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी त्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात केली.

अंबरनाथ : विम्को नाका ते गांवदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी त्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात केली. रुंदीकरणाआड येणाºया अनधिकृत दुकानांवर कारवाई करत पालिकेने हा रस्ता मोकळा केला. ज्या दुकानदारांनी उच्च न्यायालयात रूंदीकरणाविरोधात दाद मागितली आहे, ती तोडण्यात आलेली नाहीत. या रुंदीकरणात पालिकेने एकाच बाजूची बांधकामे अधिक तोडल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक विलास जोशी यांनी केला.विम्को नाका ते गावदेवी दरम्यानचा रस्ता पालिकेने विकास आराखड्याप्रमाणे ४० फूट रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या दुकानदारांची दुकाने आड येत होती, त्यांच्यावर पालिकेने हातोडा चालवला. दुकानदारांनी न्यायालयात दाद मागितल्यावर त्यांना थेट स्थगिती मिळू नये, यासाठी पालिकेने सर्व नोटिसांसंदर्भात उल्हासनगर आणि कल्याण न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे या दुकानदारांना आपले दुकाने वाचविणे शक्य झाले नाही. पण तीन ते चार दुकानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याने ती दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांवर जेसीबीने कारवाई झाली. या कारवाईला सुरुवात होताच स्थानिक नगरसेवक विलास जोशी यांनी आक्षेप नोंदविला. विकास आराखड्याप्रमाणे रस्ता करत असताना पालिकेच्या अधिकाºयांनी रस्त्याशेजारी असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला या रस्त्याचा लाभ व्हावा आणि त्याच्या इमारतीसमोरची दुकाने तोडल्यास त्याचा थेट फायदा व्हावा, या हेतूने एका बाजूला जास्त मार्किंग करित बिल्डरचे हित जपण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जोशी यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र देऊन त्याची कल्पनाही दिली होती. तसेच या संदर्भात योग्य कार्यवाहीचे आदेशही पालिकेला आले होते. मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप जोशी यांनी केला.पालिकेने सकाळीच आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती. ५० ते ६० पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कारवाईच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होते. एवढेच नव्हे, पालिकेचेही सर्व अधिकारी कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. दुपारी कारवाई थांबविण्यात आली. ज्या दुकानांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांच्यासंदर्भात निकाल येताच त्या दुकानांवरही कारवाई करणार असल्याचे देविदास पवार यांनी स्पष्ट केले. रुंदीकरण झाल्यावर आता पालिका उलनचाळ येथील रस्त्याचे काम हाती घेणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.