शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रात आणखी ४६५ बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: May 8, 2016 02:57 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. आता ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सात विशेष पथकांनी सकाळी कारवाई सुरू केली. त्यात मुंब्रा स्टेशन, बाजारपेठ, शंकर मंदिर, गुलाब मार्केट, तन्वरनगर, चाँदनगर, कौसा मार्केट, संजयनगर, अमृतनगर, दर्गा रोड, किस्मत कॉलनी, शादीमहल रोड येथील कारवाईत ४६५ मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश होता. मात्र त्यांनीही या कारवाईत फारसा अडथळा आणला नाही. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची पाहणी करून ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे आणि लगेचच तेथे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले. शनिवारची कारवाई पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, कार्यकारी अभियंता गोसावी, कोल्हे, सहायक आयुक्त मंगल शिंदे, दयानंद गोरे, मारुती गायकवाड, शंकर पाटोळे, मदन सोंडे, सागर घोलप यांनी विशेष पथकांद्वारे पार पाडली. या वेळी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तायडे उपस्थित होते.मुंब्रा येथील कारवाईला विरोध होईल असे वाटत असताना पथकाला फारसा त्रास झाला नाही. तरीही बंदोबस्त ठेवलेला होता. नेहमी विरोधाची भूमिका घेणारे नेतेच या काळात बेपत्ता झाल्याने ही कारवाई विनासायास पार पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा फक्त चर्चेत आहे. (प्रतिनिधी)