शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर चालवला हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:48 IST

शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने रस्ते मोकळे श्वास घेतील असे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले.

उल्हासनगर : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने रस्ते मोकळे श्वास घेतील असे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितले. मंगळवारी शहाड फाटक ते सी ब्लॉक व पालिका मुख्यालया समोरील रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली.मागील आठवडयात शांतीनगर ते डॉल्फिन रस्त्यावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यापाठोपाठ मंगळवारी शहाड रेल्वे स्टेशन ते सी ब्लॉक रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी, भगवान कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच पालिका मुख्यालया समोरील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सायंकाळी सुरू केल्याची माहिती शिंपी यांनी दिली.अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणे कठीण झाल्याने हे चित्र बदलण्यासाठी आयुक्त हांगे यांनी कारवाई सुरू केली. राजकीय पक्ष व नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटणार असल्याची प्रतिक्रीया रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर अतिक्रमण हटविल्याने रस्ते मोकळा श्वास घेणार असल्याचे मत हांगे यांनी व्यक्त केले. दुभाजकांना पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू केले आहे. मुख्य मार्केटमधील अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे यांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका