शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांसह निम्म्या नगरसेवकांची महासभेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:40 IST

गणपूर्तीअभावी रद्द; ओमी समर्थक नगरसेवक भूमिगत? उल्हासनगरच्या महापौर निवडीवरून वेगवान घडामोडी

उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महासभेला महापौर-उपमहापौर यांच्यासह अर्ध्याअधिक नगरसेवकांनी दांडी मारली. सभेसाठी गणसंख्या पूर्ण होत नसल्याने अखेर महासभा रद्द करावी लागली. भाजपमधील ओमी कलानी समर्थक नगरसेवक भूमिगत झाल्याने ते न आल्याची चर्चा सुरू आहे.उल्हासनगर महापालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या महासभेला महापौर पंचम कलानी व उपमहापौर जीवन इदनानी यांच्यासह अर्ध्याअधिक नगरसेवकांनी दांडी मारली. कामकाज सुरू ठेवण्यासाठी नगरसेवकांच्या आग्रहाखातर भाजपचे वरिष्ठ नगरसेवक किशोर वनवारी हे पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसले; मात्र सभेची गणसंख्या अपुरी असल्याने पालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांच्या निर्देशांनुसार महासभा रद्द करावी लागली.महापौर पंचम कलानी यांची ही शेवटची महासभा होती. त्या समर्थक नगरसेवकांसह गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले. भाजपचा महापौर निवडून येण्यासाठी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी शहरात ठाण मांडले आहे. टाउन हॉलमध्ये भाजप व साई पक्ष नगरसेवकांची रात्री बैठक होणार आहे. भाजपमधील ओमी समर्थक नगरसेवक या बैठकीला हजर राहणार नाहीत, असे ओमी टीमचे कमलेश निकम यांनी सांगितले. तर रात्री भाजप गटनेता व महापौर पदाचे उमेदवार जमनुदास पुरस्वानी हे पक्षाच्या ३१ नगरसेवकांना व्हीप जारी करणार असल्याचे संकेत शहराध्यक्ष आणि आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले. भाजपचे सर्व नगरसेवक व्हीपचे आदेश पाळणार असून भाजपचा महापौर निवडून येणार असल्याचे आयलानी म्हणाले.फुटीर नगरसेवकांची चाचपणीमहापौरपदाच्या निवडणुकीत साई आणि भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवक गळाला लागतात का? यासाठी शिवसेना शर्तीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे घोडेबाजारला ऊत आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिवसेनेच्या लीलाबाई अशान याच महापौरपदी निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर