शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

हिंदी भाषिक भवन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:06 IST

मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच,

ठाणे : मराठी माणसाच्या हिताची भाषा करणाºया शिवसेनेने मीरा-भार्इंदरमधील मतदारांना आकर्षित करण्याकरिता मराठीबरोबर हिंदी भाषेत आपला वचननामा तर प्रकाशित केलाच, पण आगरी-कोळी भवनाबरोबर हिंदी भाषिक भवनाची उभारणी करण्याचेही आश्वासन दिले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ वर्षांपूर्वी मुंबईतील वाढता हिंदी भाषिक माणूस जोडण्याकरिता ‘मी मुंबईकर’ अभियान राबवले होते. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करणाºया हिंदी भाषिकांना सोबत घेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे उधळला गेला. मात्र, मध्येमध्ये शिवसेना मनसेच्या धास्तीमुळे कडवी मराठीची भूमिका घेते. मात्र, मीरा-भार्इंदरकरिता शिवसेनेने मराठीमायबरोबर हिंदी मावशीलाही आपलेसे केले आहे.मीरा-भार्इंदरसाठी मेट्रो, क्लस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, बाळासाहेब ठाकरे कलादालन, आगरी-कोळी भवन व हिंदी भाषिक भवन, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, नवघर-कनकिया आणि घोडबंदर चौपाटी, घोडबंदर किल्ला परिसरात शिवसृष्टी, नाट्यगृह, आरमार केंद्र, रोरोसेवा, कचरा व्यवस्थापन, युवक कल्याण व शिक्षण अशा एक नाही तर अनेक योजनांचा शिवसेनेच्या वचननाम्यात समावेश आहे. आदिवासी, कोळी, मागासवर्गीय समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या वचननाम्याच्या माध्यमातून केला आहे. शिवाय, सध्या सुरू असलेल्या तर काही पूर्णत्वास येत असलेल्या कामांचा उल्लेख शिवसेनेने आवर्जून केला आहे. परंतु, हा वचननामा मीरा-भार्इंदरमध्ये प्रसिद्ध न करता ठाण्यात प्रसिद्ध करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. या वेळी हायलॅण्ड पार्क येथील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या कार्यालयात ठाकरे यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.मीरा-भार्इंदरमधील धोकादायक इमारतींसाठी क्लस्टर योजना मंजूर करून घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या कामाला सुरुवात होणार असून बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्यासाठी पालिकेने २५ कोटींची तरतूद केल्याचे नमूद केले. आरमार केंद्र आणि गं्रथालय, तरणतलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदींचा उल्लेखही करण्यात आला आहे. परंतु, यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात असून काही कामे मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत, तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली असून अशा काही जुन्याच बाबींचा उल्लेख शिवसेनेने आपल्या वचननाम्यात केला आहे. सर्वप्रथम शिवसेनेचाच वचननामा प्रसिद्ध झाला.