शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

दिवसा जिम ट्रेनर, रात्री दरोडेखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:56 IST

भिवंडी : भिवंडी शहरात दिवसा जिममध्ये व्यायामाचे धडे देऊन रात्रीच्या अंधारात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या तीन आरोपींसह एकूण नऊ जणांना ...

भिवंडी : भिवंडी शहरात दिवसा जिममध्ये व्यायामाचे धडे देऊन रात्रीच्या अंधारात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या तीन आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेचाही समावेश आहे.शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी एका खानावळमध्ये घुसून आरोपींनी खानावळ चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवला. त्याला चाकूने जखमी करीत तीन मोबाईल चोरी केल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शांतीनगर येथील दोन व निजामपुरा येथील एक अशा तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तीन आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. ते दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय इतर पाच घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, चाकू, ९ हजार रुपयांचे दोन मोबाईल, २ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे