शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

पोलीस उपनिरीक्षकास ५ हजारांचा हप्ता नक्की करणाऱ्या गुटखा तस्करास अटक

By धीरज परब | Updated: January 18, 2024 18:02 IST

आधीच्या पोलिसाला देखील ५ हजारांचा हप्ता देत असल्याची कबुली

मीरारोड - गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात आरोपी करू नये या साठी तसेच गुटखा पुरवठ्याचा व्यवसाय चालू देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाला ५ हजारांचा हप्ता नक्की करणाऱ्या गुटखा तस्करास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विशेष म्हणजे आधी देखील एका पोलिसाला नियमित ५ हजार हप्ता देत असल्याची कबुली गुटखा तस्कराने दिली आहे . 

नवघर - नया नगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने - पाटील यांच्या कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक आकाश इरले हे कार्यरत आहेत . गुटखा विक्री प्रकरणात डिसेम्बर मध्ये पानटपरीवाल्यांवर नवघर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत . त्या गुन्ह्यातील अटक आरोपीना गुटखा पुरवठा करणारा  सुरेंद्र रामपलट चौरसिया रा . नर्मदा टेरेस , नर्मदा नगर , भाईंदर पूर्व हा आकाश यांना सातत्याने कॉल करून भेटायचे आहे म्हणून सांगत होता . 

१६ जानेवारी रोजी चौरसिया हा आकाश यांना प्रत्यक्ष भेटला . आपण पान विक्रेत्यांना गुटखा पुरवत असल्याचे सांगून दाखल गुन्ह्यात आपणास पाहिजे आरोपी करू नये तसेच प्रतिबंधित गुटखा - सुगंधी पानमसाला पुरवठा व विक्री करण्यास सहकार्य करावे म्हणून महिना ५ हजार हप्ता देणार असे सांगितले . आकाश यांनी सादर प्रकरणी १७ जानेवारी रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली . 

त्या दिवशी चौरसिया हा आकाश यांना भेटला . तेव्हा त्याने आपण भाईंदर पूर्वेच्या विविध भागात गुटखा - पानमसाला पुरवत असल्याचे सांगून पूर्वीचे रमाकांत साहेब हे सुद्धा दरमहा ५ हजार हप्ता घेत असल्याचे चौरसिया याने सांगितले . या शिवाय ते पान टपरीवाल्यां कडून स्वतः जाऊन घ्यायचे ते वेगळे . पूर्वी मीटर चालू होते ते पुन्हा सुरु  करू असे चौरसिया म्हणाला . 

चौरसिया हा पोलिसाला लाच देत असल्याची खात्री पटल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधकम विभागाच्या उपअधीक्षक माधवी राजेकुंभार सह   खान, बजागे, तेटांबे यांच्या पथकाने सापळा रचला . गुरुवारी सायंकाळी चौरसिया ह्याने जेसलपार्क येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ५ हजार रुपये आकाश यांच्या टेबलावर देण्यास ठेवले . त्यावेळी सापळा रचून असलेल्या पोलिसांनी चौरसिया ह्याला अटक केली . नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा चौरसिया वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात चौरसिया याने नाव घेतलेल्या रमाकांत सह अनेक पोलिसांची गुटखा मधील हप्तेबाजी उघडकीस येण्याची शक्यता आहे .