शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा बेतला? तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, रुग्णालयात सुरू होते उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:48 IST

केडीएमसीच्या येथील क्रीडासंकुलातील तरणतलावात शरद परिहार (२२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी तो रात्री बुडाल्याने बेशुद्ध पडला होता.

डोंबिवली : केडीएमसीच्या येथील क्रीडासंकुलातील तरणतलावात शरद परिहार (२२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी तो रात्री बुडाल्याने बेशुद्ध पडला होता. त्याला उपचारासाठी एमआयडीसी निवासी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याने गुटख्याचे सेवन केले होते. तेच त्याच्या जीवावर बेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.शरद हा कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी भागातील रहिवासी होता. रविवारी रात्री ८ च्या सुमारास तो मित्रासमवेत क्रीडासंकुलातील तलावात पोहण्यासाठी आला होता. त्याने तलावात उडी मारली, परंतु तो पुन्हा वर आलाच नाही. ही बाब तेथील जीवरक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तलावात उडी मारून शरदला पाण्याबाहेर काढले. तो बेशुद्ध पडल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, ते निष्फळ ठरले. या वेळी शरदला उलटीही झाली. यात त्याने खाल्लेला गुटखा बाहेर पडला.बेशुद्ध पडलेल्या शरदला उपचारासाठी एमआयडीसी परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती क्रीडासंकुलातील तरणतलावातील व्यवस्थापकांकडून देण्यात आली. तरणतलावात सात जीवरक्षक तैनात असून दोन प्रशिक्षक आहेत.दरम्यान, शरद याच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.