शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:13 IST

विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम, योजना राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकास करणाºया गुलाबराव पाटील यांना शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कल्याण- विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम, योजना राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकास करणाºया गुलाबराव पाटील यांना शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.मुंबईतील परळ येथील दामोदर नाटयगृहात सेकंडरी स्कूल एम्पॉयीज के्रडीट सोसायटीने नुकताच गुणगौरव कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे.पाटील हे कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक असून शिक्षक परिषदेचे महानगर कार्यवाह तसेच मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी ते सातत्याने उपक्रमांचे आयोजन करीत असतात. बाल महोत्सव, आजी आजोबा स्नेहसंमेलन, बैलपोळा, विद्यार्थी सुरक्षितता, समुपदेशन अशा उपक्रमांव्यतिरिक्त शासनाच्या बहुचर्चित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत त्यांनी अनेक योजना शाळेमध्ये राबविल्या आहेत. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.फोटो आहे.------------------------------------------------------------डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शनडोंबिवली- इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेतर्फे आणि डोंबिवलीकर मासिकाचे संपादक, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ३ आणि ४ फेबु्रवारीला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे डोंबिवली रोझ फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनाच त्रस्त झालेल्या डोंबिवलीकरांना या फेस्टीवलमधून छानछान गुलाब पाहायला मिळणार आहेत.गुलाबांची नजाकत काही औरच असते. त्याचे मनमोहक रूप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमॅटीक व्हॅल्यू आबालवृध्दांच्या मनाला नक्कीच साद घालते. महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाºया व्यक्ती आणि संस्थांना या फेस्टीवलमध्ये आमंत्रित केले आहे. मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नागपूर येथील गुलाब या फेस्टीवलमध्ये दिसणार आहेत. ठाणे जिल्हयातील डॉ. विकास म्हसकर आणि मोरे बंधू यांचा ही प्रदर्शनात सहभाग असणार आहे. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त फेस्टीवलमध्ये आकर्षक पुष्परचना सजावट आयोजित केली आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्रस्थानी ठेवून अन्य फुले लावण्यात येणारआहे.------------------------------------------------------------