शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

डहाणूतील चिकू उत्पादकांना जीआयचे शनिवारी मार्गदर्शन

By admin | Updated: November 18, 2016 02:03 IST

जागतिक बाजारपेठेत डहाणू घोलवडच्या चिकूला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले असून त्याच्या नोंदणीबद्दल विशेष मार्गदर्शनाचे आयोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

बोर्डी : जागतिक बाजारपेठेत डहाणू घोलवडच्या चिकूला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले असून त्याच्या नोंदणीबद्दल विशेष मार्गदर्शनाचे आयोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. डहाणूतील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून आर्थिक विकास साधण्याची महत्वपूर्ण संधी आहे. दरम्यान पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिकू हे प्रमुख पीक असून साडेचारहजार हेक्टर क्षेत्र चिकू बागायतीने व्यापले आहे. या वर्षी देशभरातून ज्या पाच फळांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले त्या मध्ये चिकूचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने या करिता अर्ज केला होता. त्यानुसार २९ जून रोजी डहाणू चिकू या नावाने जागतिक बाजारपेठेत चिकूला ऐतिहासिक ओळख मिळाली आहे.तालुक्यातील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून त्यामुळे घसघाशीत आर्थिक लाभ होणार आहे. दरम्यान, पुणे येथील ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टंसी या संस्थेचे मुख्याधिकारी प्राध्यापक गणेश हिंगमिरे हे शनिवारी डहाणूतील चिकू भागायतदारांना भौगोलिक मानांकन म्हणजे काय? त्याचा बागायतदारांना कोणता लाभ घेता येईल या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या करिता डहाणूतील कृषक समाज कार्यालयात सकाळी ९ वाजता, बोर्डीतील गजीताई सभागृहात साडेनऊ वाजता तर दुपारी तीन वाजता चिंचणी सोसायटी कार्यालयात हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे. या करिता बागायतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक पालघर जिल्हा कृषी अधिक्षक आर. जी. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. सावंत यांनी केले आहे.त्याचा लाभ जास्तीत जास्त चिकू बागायतदार घेण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)