शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचा पारा चढला, अंबरनाथमध्ये एकाच प्रभागात सेनेची दोन कार्यालये थाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:36 IST

अंबरनाथच्या नवरेनगर भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना शिवसेना शाळेसमोरच पक्षाचे दुसरे संपर्क कार्यालय पाहायला मिळाले.

अंबरनाथ - अंबरनाथच्या नवरेनगर भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना शिवसेना शाळेसमोरच पक्षाचे दुसरे संपर्क कार्यालय पाहायला मिळाले. एकाच प्रभागात दोन कार्यालये पाहून पालकमंत्री चांगलेच संतापले. उद्घाटनाच्या भाषणातच त्यांनी आपला संताप व्यक्त केला. एकाच प्रभागात दोन कार्यालये सुरू करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील, तर कामांमध्ये स्पर्धा करावी. संघटनेत वाद दिसल्यास दोन्ही कार्यालये बंद करीन, असा इशारा दिला. पालकमंत्र्यांच्या या भाषणामुळे दोन्ही गटांतील पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.अंबरनाथ शिवसेनेमधील गटबाजी पुन्हा एकदा सर्वांच्याच निदर्शनास आली. शहरातील संघटनेत दोन गट असतानाच आता प्रभागातदेखील शिवसेनेच्या अंतर्गत संघटनेतही दोन गट असल्याचे लक्षात आले. प्रभागातच शिवसेनेने दोन गट तयार केल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनास आली. नवरेनगर येथे शाखाप्रमुख रोहित धेंड यांनी नवरेनगर शिवसेना शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी शिंदे हे नवरेनगर भागात येताच त्यांचे लक्ष समोर असलेल्या शिवसेनेच्याच दोन कार्यालयांकडे गेले. एकाच प्रभागात दोन कार्यालय असल्याने त्यांनीदेखील या दोन्ही कार्यालयांची माहिती घेतली.एका बाजूला नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन असल्याने ती शाखा रोहित धेंडे यांची असल्याचे सांगण्यात आले. एकाच प्रभागात समोरासमोर दोन कार्यालये थाटली आहेत.‘गटबाजी खपवून घेतली जाणार नाही’शहरात असो वा प्रभागात, दोन गट खपवून घेतले जाणार नाही. मतभेद असतील तर आपल्या कामातून स्पर्धा निर्माण करावी. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धा करावी. मात्र, संघटनेला घातक ठरेल, अशी गटबाजी चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या प्रभागातील दोन कार्यालये सुरू असले, तरी त्यातून नागरिकांची कामे झाली पाहिजेत. अन्यथा, दोन्ही कार्यालये बंद केली जातील, असा इशारा देत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.या कार्यालयासमोर जे शिवसेना संपर्क कार्यालय होते, ते कुणाचे आहे, याची माहिती घेतली असता शिवसेना विभागप्रमुख मिलिंद गाण यांचे असल्याचे सांगण्यात आले.नव्या शाखेचे उद्घाटन झाल्यावर शिंदे यांनी गाण यांच्या कार्यालयालाही भेट दिली. मात्र, आपला संताप त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना