शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

जीएसटीमुळे विकासकामांवर गंडांतर! शिवसेना गटनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:19 AM

केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे.

कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील विकासकामांचे आधीच तीनतेरा वाजले असताना आता जीएसटीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परित्रकामुळेही येथील विकासकामांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता आहे. २२ आॅगस्टपर्यंत ज्या विकासकामांचे कार्यादेश दिलेले नाहीत, त्या कामांच्या फेरनिविदा काढा, असे परिपत्रक सरकारने काढले आहेत. यामुळे विकासकामांना लागणारा बे्रक पाहता शिवसेना गटनेता रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सोपस्कार करून मंजूर झालेल्या विकासकामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.केंद्र सरकारने १ जुलैपासून सीएसटी लागू केला. त्यावर राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना २२ आॅगस्टला परित्रक जारी केली आहेत. मात्र हे करत असताना सरकारने महापालिकांच्या अडचणी लक्षात घेतल्या नसल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले आहे.या निर्णयामुळे शहरी विकासकामांना फटका बसणार आहे, स्थायी समितीने दिलेल्या विकासकामांना सरकारनेच स्थगिती आदेश दिल्याने आठ महिने कामे रखडली होती. यातील बहुतांश कामे कार्यादेशापर्यंत तसेच कार्यादेश झालेली कामे पावसाळ््यामुळे व इतरही काही कारणामुळे होऊ शकलेली नाहीत. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, शौचालये बांधणे ही मुलभूत सुविधांची कामेही धिम्या गतीने सुरू असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.नोटबंदीनंतर नागरी प्रकल्पांच्या दृष्टीने जीएसटीचा निर्णयही जीवघेणा ठरला आहे. यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारावर उपासमारीची तसेच आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी ठरणारा आहे. यामुळे जीएसटीची अंमलबजावणी करताना कार्यादेश झालेल्या व सर्व सोपस्कार पूर्ण झालेल्या विकासकामांना संमती द्यावी, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कंत्राटदारांकडून जीएसटी भरण्याबाबतचे लेखी संमतीपत्रक घेऊन विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी जाधव यांनी पत्रात केली आहे.