शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बारावे प्रकल्पाला हिरवा कंदील

By admin | Updated: December 22, 2016 05:39 IST

येथील बारावे गोदरेज हिल परिसरात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भरावभूमी प्रकल्प उभारण्यास

कल्याण : येथील बारावे गोदरेज हिल परिसरात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भरावभूमी प्रकल्प उभारण्यास मंगळवारच्या महासभेत स्थानिक नगरसेविका रजनी मिरकुटे वगळता अन्य सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी मान्यता दिली. यासंदर्भात प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव बहुचर्चेनंतर मंजूर करण्यात आला. शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. काही ठिकाणी कामांना प्रारंभही झाला आहे. तसेच आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी नुकतीच निविदा मंजूर करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचाच एक भाग म्हणून बारावे गोदरेज हिल परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाने सादर केला होता. बारावे येथे हा प्रकल्प मे. गोदरेज कन्झ्युमर्स प्रॉडक्ट लिमिटेड ही कंपनी १० वर्षे कालावधीसाठी चालवणार आहे. या प्रकल्पातून किमान दैनंदिन १८ मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यात महापालिकेची तीन कोटी २८ लाखांची बचत होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, हा प्रस्ताव चर्चेला येताच मिरकुटे यांनी विरोध दर्शवला. गोदरेज हिल परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. तसेच प्रकल्पासाठी जागाही पुरेशी नाही. याठिकाणी बीएसयूपी प्रकल्प तसेच शाळाही असल्याने या प्रकल्पामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, याकडे मिरकुटे यांनी लक्ष वेधले.महापालिका प्रशासन एखाद्या प्रभागात प्रकल्प राबवताना स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेत नाही, असा आरोप यावेळी दीपेश म्हात्रे यांनी केला. प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात आणून देणे आवश्यक होते. त्यातूनच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल, असे म्हात्रे म्हणाले. महापालिका हद्दीत १३ बायोगॅस प्रकल्प राबवले जाणार आहेत. ते सर्व एकत्रितपणे सुरू करा, अशी मागणी करताना या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय, असा सवाल नगरसेवक जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. यावर, उंबर्डे, आयरे आणि राजूनगर याठिकाणी प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी घेऊन पुढील कार्यवाहीला प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)