शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मलनि:सारण प्रकल्पाला सरकारचा हिरवा कंदील

By admin | Updated: January 11, 2017 07:14 IST

अमृत अभियान योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालाला सरकारच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे

कल्याण : अमृत अभियान योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालाला सरकारच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत १२ सेक्टरमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भातल्या कार्यवाहीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत अभियान योजनेत राज्यातील ४४ शहरांची निवड झाली आहे. त्यात कल्याण-डोंबिवली शहरेही आहेत. याप्रकरणी केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. यात प्रकल्प अहवालासंदर्भात नेमलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने केडीएमसीच्या अहवाला मान्यता दिली आहे. त्याला महापालिकेतील संबंधित विभागाने दुजोरा दिला आहे. परंतु, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने याबाबतचे मंजुरीचे पत्र आचारसंहितेनंतरच महापालिकेला मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्या भागात मलवाहीन्या नाहीत, तेथे ही मलनि:सारण योजना राबवली जाणार आहे. या योजनेत ८० किलोमीटर मलवाहिन्या आणि १४ पंम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. याआधी केडीएमसी हद्दीत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत मलनि:सारण योजना ही १८ सेक्टरमध्ये राबविण्यात आली होती. आता अमृत अभियानांतर्गत ती उर्वरित १२ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. यात उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळवली-गंधार, लोकग्राम, कचोरे, टिटवाळा (पूर्व-पश्चिम), डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव या प्रमुख भागांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)