शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

मीरारोडच्या बड्या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पाची त्रिसदस्य समितीकडून चौकशीचे हरित लवादाचे आदेश   

By धीरज परब | Updated: November 30, 2022 14:27 IST

Mira Road: मीरारोड पूर्वेला एव्हरस्माईल प्रा.ली. यांनी सृष्टी , कल्पतरू नावाने मोठ्या वसाहती विकसित केल्या आहेत.  त्यांचा सृष्टी सेक्टर -२ (अ) नावाने नवीन गृहनिर्माण प्रकल्पचे बांधकाम सुरु आहे .

मीरारोड - मीरारोडचा नवीन सृष्टी बांधकाम प्रकल्प हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून होत असल्याच्या याचिकेची हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दखल घेत सिया (महाराष्ट्र पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण ), एमपीसीबी ( महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ) व एमसिझेडिएमए (महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण) यांची त्रिसदस्य समिती नियुक्त करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .

मीरारोड पूर्वेला एव्हरस्माईल प्रा.ली. यांनी सृष्टी , कल्पतरू नावाने मोठ्या वसाहती विकसित केल्या आहेत.  त्यांचा सृष्टी सेक्टर -२ (अ) नावाने नवीन गृहनिर्माण प्रकल्पचे बांधकाम सुरु आहे . याचिकाकर्ते इरबा कोनापुरे व साबीर सय्यद ह्यांनी हरित लवाद कडे दाखल याचिकेत ,  मौजे पेणकर पाडा येथील सर्व्हे क्रमांक ६५, ६८, ६९ आदी ठिकाणी सीआरझेड १ व २ मध्ये तसेच उच्चतम भरती रेषा असलेल्या जागेवर महापालिकेकडून बांधकाम  परवानगी देण्यात आली आहे.

पालिकेने विकासकाम सीआरझेडची परवानगी घेऊन मग बांधकाम करावे असे कळवले असताना सुद्धा शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न-घेता विकासकाने बेसमेंट अधिक, तळ, पोडियम अधिक नऊ मजल्याच्या इमारती बांधकाम होत आहेत .  याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले तसेच येथील शेकडो झाडे तोडण्याची पालिकेने परवानगी दिली व झाडे तोडली गेली आहेत.

हरित लवादाच्या  न्यायाधीश दिनेश सिंह व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्रिसदस्य समिती नियुक्तीचे आदेश दिले आहेत . याचिकाकर्त्यांचे वतीने ज्येष्ठ वकील नितीन लोणकर सह ऍड. सोनाली सूर्यवंशी, ऍड. तानाजी गंभीरे यांनी बाजू मांडली . 

टॅग्स :mira roadमीरा रोड