शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘सरस’मधील पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:57 IST

चहाच्या कपबशांपासून लहान मुलांच्या पिगी बँक, जेवणाच्या भांड्यांना ग्राहकांची पसंती

ठाणे : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या गावखेड्यांमधील बाराबलुतेदारांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायाकरिता तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ आदींना आधुनिकतेची जोड देऊन ते ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत सुरू असलेल्या ‘सरस’मध्ये सर्वांसाठी उपलब्ध केले आहे.यामध्ये चहाच्या कपबशांपासून लहान मुलांच्या पिगी बँक, जेवण करण्याची विविध भांडी अशा असंख्य वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे. पारंपरिक व्यवसायातून मातीची भांडी तयार केली जात आहेत. हा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून ग्रामीण भागाच्या उरण परिसरात सुरू आहे. ही मातीची भांडी विकण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यागत अनेक महिला फिरतात. पण, आता ही नावीन्यपूर्ण भांडी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या सरसला भेट देणाऱ्या चोखंदळ ग्राहकांकडून या भांड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पूनम हातनोलकर यांनी सांगितले. याप्रमाणेच सांगलीहून आलेल्या आदर्श स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्कृष्ट पादत्राणे, बूट सरसमध्ये विक्रीकरिता ठेवले आहेत. उत्तम दर्जाची ही पादत्राणे खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ‘सरस’ ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.स्वयंसहायता समूहांचा सहभागकोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भातून १२० स्वयंसहायता समूह सहभागी झालेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन विभागीय कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते यांनी केले आहे.