शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मियांसाठी एकाच छताखाली स्मशानभूमी

By admin | Updated: March 15, 2017 02:26 IST

ठाणे महापालिकेने आता एकाच छताखाली सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने आता एकाच छताखाली सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. तब्बल ३७ हजार चौ.मी. क्षेत्रफळावर या स्मशानभूमी विकसित केल्या जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने विविध धर्मियांची संख्यादेखील वाढत आहे. परंतु, त्यांच्यासाठी स्मशानभूमी नसल्याचा मुद्दा अनेकदा स्थायी आणि महासभेत गाजला आहे. यामुळेच आता घोडबंदर-भार्इंदरपाडा येथील सेक्टर क्र. ६ मधील ३७ हजार चौ.मी.चे क्षेत्र स्मशानभूमीसाठी विकसित करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार ३७ हजार चौ.मी. जमीन हरित विभागातून वगळून त्याठिकाणी ही संयुक्त स्मशानभूमी उभारण्यात येणार आहेत. तसेच येथेच स्मृती उद्यानही विकसित केले जाणार असून या आरक्षणामध्ये ३० मीटर रुंदीचा बफर झोन ठेवण्याच्या अटी सापेक्ष आरक्षण शासन निर्णयानुसार मंजूर केले आहे.यानुसार संपूर्ण स्मशानभुमींचा लेआऊट तयार करण्याचा आणि समाजानुसार क्षेत्रफळ निश्चित करण्याचा एकत्रित प्रस्ताव २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. याला मंजुरी मिळाल्यास ३७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हिंदू समाज - दहन, दफन - ८ हजार, दाऊदी बोहरा समाज -३ हजार, ख्रिश्चन समाज -३ हजार, ज्यु समाज - २ हजार, लिंगायत समाज - २ हजार, अन्य धर्मियांकरीतादेखील मागणीनुसार वापर भविष्यात निश्चित करण्यात येणार असून त्यासाठीदेखील ४ हजार चौरस मीटर जागा ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पार्किंगसाठी ३ हजार आणि स्मृती उद्यान व बफर झोन यासाठी १० हजार चौरस मीटर, १२ मीटर रुंद रस्त्यासाठी २ हजार चौरस मीटर जागा ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)