शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

दिव्यांगासाठी हजार रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:57 IST

अंबरनाथ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. मात्र हा निधी खर्च होत नसल्याने नाराजीचा सूर होता

पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ३ टक्के निधी राखून ठेवण्यात येतो. मात्र हा निधी खर्च होत नसल्याने नाराजीचा सूर होता. आता पालिकेने ६० टक्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये अनुदान देण्यास सुरूवात केली आहे. डिसेंबर पासून या योजनेला सुरूवात करण्यात आलेली आहे.अंबरनाथ नगरपालिका दिव्यांगांसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम राबवत नाही अशी तक्रार येत होती. मात्र दोन वर्षात पालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवत ३ टक्के निधी खर्च करण्यास सुरूवात केली आहे. मात्र तरीही संपूर्ण निधीचा उपयोग करता येत नसल्याने पालिकेने आता सरकारी नियमानुसार दिव्यागांना दरमहा एक हजार रूपये अनुदान देण्याचे धोरण अवलंबले आहे. ६० टक्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तीला हे अनुदान दिले जाते. ज्या दिव्यांगांनी पालिकेकडे नोंद केलेली आहे त्यांच्या बँक खात्यात हे अनुदान दर महिन्याला वर्ग करण्यात येते.अंबरनाथमध्ये आजच्या घडीला २६८ दिव्यांगांना पालिकेच्या वतीने हे अनुदान दिले जाते. डिसेंबरपासून ही योजना राबवण्यात येत असून मार्च महिन्यात चार महिन्यांचे अनुदान एकाच महिन्यात वर्ग करण्यात आले आहे. तर एप्रिलपासून दर महिन्याला बँक खात्यात हे पैसे जमा होतील. अंबरनाथ नगरपालिकेने ठराव करून हे अनुदान देण्यास मान्यता दिली होती. या सोबत इतर दिव्यांगांनाही योजनेचा लाभ व्हावा यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.दिव्यांगांना अनुदान देण्यासोबत आता पालिकेने अंबरनाथ शहरातील सर्व शाळेतील प्रत्येक दिव्यांगाला अनुदान देण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहरात शिक्षण घेणाऱ्या आणि राहणाºया प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. आजच्या घडीला ३७९ च्या वर दिव्यांग विद्यार्थांची नोंद असून त्यात आणखी भर पडणार आहे. या प्रत्येक विद्यार्थ्यांनाही पालिकेकडून आर्थिक आणि साहित्यांचे वाटप केले जाणार आहे.