शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजींनी पटकावली खुर्ची, आजोबांचा विटीला फटका, आजीआजोबा संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 06:29 IST

संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क आपल्या आजारपणाचा विसर पडला.

डोंबिवली : संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क आपल्या आजारपणाचा विसर पडला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आजीआजोबांनी फुल्ल-टू-धम्माल उडवली. अर्थात, निमित्त होते ते विद्यानिकेतन शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजीआजोबा संमेलनाचे.आजी... आजी जोरात पळ, ती बघ खुर्ची... असं सांगत छोटा राहुल आपल्या आजीला संगीतखुर्चीच्या खेळात प्रोत्साहन देत होता, तर चमचालिंबू घेऊन जाणाºया आजोबांना चिमुकली ईशा टाळ्या वाजवून चिअरअप करत होती. संगीताचा दणदणाट सुरू असताना पटकन खुर्ची पटकावण्याची अ‍ॅक्शन करून एखाद्या आजी या आजोबांची फिरकी घेत होत्या, तर आजोबांच्या विटीदांडूच्या खेळातील उत्साह पाहून आजी त्यांना प्रोत्साहित करत होत्या. या संमेलनात छोटे होण्याचा मनमुराद आनंद लुटलेल्या आजीआजोबांची संख्या थोडीथोडकी नव्हे चक्क ५०० ते ५५० होती.बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करत असल्याने आपल्या नातवाला आजीआजोबा सोडतात. परंतु, आपल्या नातवाची शाळा कशी आहे, हे आजीआजोबांना समजावे म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. पालकसभा अथवा परीक्षांचा निकाल या दोन दिवशी विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येतात. त्यावेळी पालक आपल्या मुलामुलींच्या विकासाचा आढावा घेतात. या संमेलनामुळे आपल्या नातवांच्या शाळेत आनंदाचे क्षण घालवता आले. तसेच या संमेलनामुळे त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळाल्याची कबुली आजीआजोबांनी दिली. यावेळी आजीआजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, नृत्य अशी सांगीतिक मैफल ठेवली होती. कॉर्पोरेट कीर्तनाचेही आयोजन केले होते. शाळेतील शिक्षकांनी आजींच्या हातांवर मेहंदी काढली.शाळा एक कुटुंबविद्यानिकेतन शाळेचे संस्थापक व प्राचार्य विवेक पंडित गेली अनेक वर्षे आजीआजोबांसाठी संमेलन आयोजित करत आहेत. शाळा हे एक कुटुंब आहे. कुटंबातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी त्यांच्या आजीआजोबांसाठी अनेक उपक्रम शाळेकडून हाती घेतले जातात. त्याचाच शनिवारचे हे संमेलन एक भाग होते.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली