शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
2
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
3
अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ मृत्यू, २७९ जण बेपत्ता
4
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
5
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
6
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
7
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
8
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
9
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
10
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
11
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
12
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
13
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
14
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
15
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
16
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!
17
VIDEO: बापरे... पुराच्या पाण्यात दिसला महाभयानक साप, थायलंडच्या लोकांमध्ये प्रचंड घबराट
18
बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली, ढसाढसा रडली; कुटुंबाला संशय, पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन्...
19
कोट्यधीश करणारे १० स्टॉक्स! २८ वर्षांत १०,००० रुपयांचे केले तब्बल १९ कोटी! तुमच्याकडे कोणता आहे?
20
WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:56 IST

प्रचारात रंगत : काही ठिकाणी मात्र एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात रंगला आहे. आठ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. मात्र, जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पुरस्कृत उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. या तिन्ही पक्षांचे  विधानसभेत जमले.  मात्र, त्या राजकीय डावपेचांना न जुमानता स्थानिकांकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुका आपल्याच मर्जीने लढविल्या जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५८ च्या निवडणुका होत आहेत. एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींपैकी आठ बिनविरोध ठरल्या. तर उर्वरित १४३ च्या निवडणुकांसाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवार राजकीय पक्षांचे पुरस्कृत आहेत, पण राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधाऱ्यांनी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीच्या राजकारणास विचारात न घेता आपल्या गावातील एकमताचा आदर व त्यातील एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढण्यास गावकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.  

 निकालानंतर बदलू शकते चित्रn ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आक्रमकतेकडे 'वेट अँन्ड वॉच, ॲफ्टर कॅच ! चे सूत्र महाविकास आघाडीने अवलंबले आहे. n जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य अधिक आहे. भिवंडीला भाजप, शहापूर, मुरबाडला शिवसेना आणि कमी अधिक प्रमाणात कल्याण अंबरनाथलाही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नाते, संबंधावर उमेदवार दिला जातो. जिल्ह्यात काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत आहेत. वरप गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकली आहे, पण काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार प्रतिस्पर्धीही आहेत.  - दशरथ तिवरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ग्रामपंचायती निवडणुकीत एकाच घरातील व्यक्ती एकमेकांविरोधात लढतात. तेव्हा पक्ष म्हणून आपण त्यांच्यात भांडण लावणे योग्य नाही.  त्यांच्यात फूट पाडून या निवडणुका लढल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही या निवडणुकांत रस घेतलेला नाही. मी खासदार हाेतो तेंव्हाही या निवडणुकांमध्ये सहभागी झालेलो नाही. या निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत.  - सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

नातेसंबंधांना महत्त्वस्वपक्षाचे उमेदवार स्थानिक नातेसंबंध, पाठबळ विचारात घेऊन या निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेले आहेत. त्यांचा प्रचारही गावांत शिगेला पोहोचला आहे. एक हजार ४७२ सदस्यांसाठी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये ४१८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार उत्तम आहे. गावपाड्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीतही शिवसेनेसह आघाडीचे पुरस्कृत मोठ्या प्रमाणात विजयी होतील. त्यासाठी जिल्ह्याचा एक आढावा घेण्यात येत आहे.  -प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक